Home Breaking News आ.समिर कुणावार यांचे पुढाकाराने आदिवासी बांधवांना शेतजमीनीचे पट्टे वितरित..

आ.समिर कुणावार यांचे पुढाकाराने आदिवासी बांधवांना शेतजमीनीचे पट्टे वितरित..

173

 

हिंगणघाट प्रतिनिधी, दि.०३
आदिवासी बांधवांचे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित शेतजमिनीचे पट्टे विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांच्या अथक प्रयत्नामुळे आता आदिवासी बांधवांना मिळाले असून गावातील आदिवासी तसेच पारधी समाजाच्या नागरीकांनासुद्धा घरकुलासाठी पट्टे मिळालेले आहेत, यातील काही प्रलंबित प्रकरणात तात्काळ पट्टे देण्यात यावे,यासाठी आ. समीर कुणावार हे प्रयत्नशील असल्याचे दिसुन येत आहे.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील जिल्ह्यातील सेलु तालुक्याअंतर्गत जुनोना येथील वनविभागाअंतर्गत येणाऱ्या शेतजमीनीचे पट्टे नुकतेच वितरित करण्यात आल्याने या पट्टेधारकांनी आनंद व्यक्त करीत आ. समीर कुणावार यांचे आभार व्यक्त केले आहे.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सर्वच अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमाकुल करण्यात यासाठी आ. समीर कुणावार हे जिल्हाधिकारी तसेच वनविभागाचे अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात असून अतिक्रमणधारकास वनजमीनी तसेच रहिवासी भूखंडाच्या अधिकाराचे पट्टे मिळवून देण्याचे कारवाईत हिंगणघाट विधानसभा क्षेत्र अग्रेसर असल्याचे निदर्शनास येत आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

Previous articleमॉंटेरिया व्हिलेज, एक अभिनव प्रयोगशील ठिकाण, शहरी प्रवाशांच्या स्वागताकरिता सज्ज
Next articleनावाने 8 अ असून ग्रा.प .सचिवाने बेकायदेशीर गोठा पाडला ..