Home बुलढाणा नावाने 8 अ असून ग्रा.प .सचिवाने बेकायदेशीर गोठा पाडला ..

नावाने 8 अ असून ग्रा.प .सचिवाने बेकायदेशीर गोठा पाडला ..

238

 

प्रतिनिधी जगन मोरे

श्री गजानन प्रल्हाद कोकाटे यांनी मुख्य कार्यकारि अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे आज दि .02/02/2022 ला तक्रार दिली आहे .त्या तक्रारी मध्ये त्याने असे नमूद केले कि माझ्या नावाने 4 ते 5 वर्षपासून सदरहू अतिक्रमण ग्रा .प .टिटवी येथे नोंदणीकृत आहे .त्या ठिकाणी माझा गुरांचा गोठा होता .ग्रामसेवक दीपक डोंगरदिवे ग्रा .प .टिटवी यांनी कोणतेही कारण नसताना किन्वा लेखी किंवा तोंडी नोटीस न देता सदरहू अतिक्रमण जागेत समशानभूमीची संरक्षण भिंत बांधायची आहे म्हुणुन हि जागा विशाल श्रीहरी राऊत यांची जे सी बी लावून बेकायदेशीरपणे माझ्या गुरांचा गोठा तोडला .याबाबत विचारले असता अरेरावीची भाषा वापरून उडवाउडवीची उत्तरे दिली .त्यामुळे माझे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे .
ग्रामसेवक दीपक डोंगरदिवे ग्रा .प .टिटवी यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असून त्यांच्यावर त्वरित निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी व माझे आर्थिक नुकसान भरपाई भरून देण्यात यावी .अशी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे केली

Previous articleआ.समिर कुणावार यांचे पुढाकाराने आदिवासी बांधवांना शेतजमीनीचे पट्टे वितरित..
Next articleआडगाव येथे उधारीचे पैसे परत मागील्याच्या रागात एकाला लाकडी दांडाने बेदम मारहाण पोलीसात गुन्हा दाखल