(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला
घुग्घुस भारतीय जनता पार्टी चा महाराष्ट्र उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश सचिव संजय तिवारी याने वेकोली कॉलोनीचा दुर्दशा व दुरव्यवस्था मुळे गुरुवारी 27 जानेवारीला क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावले यांना निवेदन दिले आहे, निवेदनत शास्त्रीनगर, रामनगर, गांधी नगर ,सुभाश नगर ,इंद्रा नगर, बंगाली कॅम्प, मुख्य सडक आणि रोड शेतीग्रस्त आहे जागा जागी खड्डे असल्याने खूप परेशानी होत आहे.
किती वेडा वेकोलि ला निवेदन देऊनही आज पर्यंत काम केलेले नाही. पावसाळ्यात कॉटर्स ची छत, पाणी टपकत राहते खिडकी व दरवाजे शतीग्रस्त होऊन आहे केव्हाही दुर्घटना होण्याची शक्यता आहे .कॉटर मध्ये राहणाऱ्या वेकोली कर्मचारी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.संजय तिवारी यांनी निवेदन केले की लवकरात लवकर कामे पूर्ण करावे .नाही तर उपोषण करणार . यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा विवेक बोडे , सिनु ईसारफ,मल्लेश बल्ला, उपस्थित होते.