Home Breaking News शेतकऱ्यांना लुबाडणार्या सुरेश पाईकराव विरोधात पोलीसात तक्रार दाखल ; घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांनी...

शेतकऱ्यांना लुबाडणार्या सुरेश पाईकराव विरोधात पोलीसात तक्रार दाखल ; घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांनी दर्शविला विरोध

295

 

(चंद्रपूर घुग्घूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घूस (चंद्रपूर) : बि.आर.एस.पी जिल्हा महासचिवआणि सफेदझेंडा कामगार संघटनेचे अध्यक्ष व घुग्घूस रहवासी सुरेश पाईकराव यांच्या विरोधात 03 फेब्रुवारी रोजी राजुरा तालुक्यातील सूब्बई (चिंचोली) येथील साठ – सत्तरच्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी तीन वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशनवर धडकले. पाईकराव यांच्यावर शेतकऱ्यांची लुबाडणूक व फसवणूक केल्या प्रकरणी भादंवी 420 नुसार गुन्हा दाखल करण्याचे निवेदन पो.उप – निरीक्षक संजय सिंग यांना दिले.शेकडो कि.मी.चा प्रवास करून आलेल्या शेतकऱ्यांनी
बि.आर.एस.पी नेता सुरेश पाईकराव यांचा भंडाफोड केला.
राजुरा तालुक्यातील विरुर पो.स्टेशन अंतर्गत येणारे सूब्बई व चिंचोली गावातील 87 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा सोबत वेकोली तर्फे शेतीचा मोबदला व नोकरी मिळवून देतो अशी भूलथापा देऊन चार लाख पस्तीस हजार रुपये लंपास केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.या प्रकरणात 21 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांनी विरुर पो. स्टे.ला तक्रार दाखल केली होती.दहा दिवसां नंतरही कुठल्याही प्रकारे कारवाई होत नसतांना शेतकऱ्यांना फसविणारा पाईकराव आता कामगारांना न्याय मिळवून देण्याचा सोंग करीत असल्याचे निर्दशनास येताच संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट घुग्गूस येथेच येऊन हल्लाबोल केला.

प्रकल्पग्रस्तां सोबत धोखा कशासाठी ?

गेल्या आठवड्या पासून एसीसी कंपनीच्या न्यू पॅकिंग हाऊस प्लांटच्या कामगारांच्या मागण्यांना घेऊन पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन शुरु आहे. कंपनीवर पी.एफ चोरीचा आरोप लावून कारवाईची मागणी करीत असलेल्या पाईकरावने तक्रार दाखल झाल्याच्या दहा दिवसानंतर ही शेतकऱ्यांचे चार लाख पस्तीस हजार रुपये परत केले नाही.जो कामगारांच्या पि.एफला घेऊन मोठ्या – मोठ्या गोष्टी करत आहे.
त्यानेच लाखो रुपयाने शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्याच्यावर कारवाई होत नसल्याने नेता व पोलिसांच्या हातमिळवणीनेच सदर प्रकार घडत असल्याचा आरोप ही शेतकऱ्यांनी केला.तसेच या प्रकरणात क्षेत्राच्या खासदारांनी शेतकऱ्यांची बाजू संसदेत उचलून धरावी असे आवाहन केले. पाईकराववर 420 चा गुन्हा दाखल न झाल्यास पाईकराव करीत असलेल्या आंदोलन मंडप शेजारीच आंदोलन शुरू करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

Previous articleWcl वेकोली कॉलनी चे दुरुस्ती करा. अन्यथा उपोषण करणार ..संजय तिवारी
Next articleविदर्भवीर शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्राचे नेते मा_आमदार_कै_भाई_के_आर. पाटील_यांची_जयंती_निमित्त