Home चंद्रपूर हळदी – कुंकू कार्यक्रमातुन महिला सक्षमीकरणाचा “,नारा’

हळदी – कुंकू कार्यक्रमातुन महिला सक्षमीकरणाचा “,नारा’

236

 

महिला काँग्रेसनी दिली पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड

( चंद्रपूर घुग्गूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : महिला शहर काँग्रेस तुकडोजी नगर वॉर्ड क्रं सहाच्या वतीने दिनांक 03 फेब्रुवारी रोजी तीळ – गूळ व हळदी – कुंकू व वाण वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. विजयाताई बंडीवार,सौ. पदमाताई राजूरेड्डी,सौ.पुष्पाताई नक्षिणे,सौ.दीपा बोकडे यांनी केले असून सदर पारंपरिक कार्यक्रमाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण,स्वरक्षण, यावर जनजागृती करीत महिलांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता नृत्य, गायना सह विविध कार्यक्रम आयोजित केले
कार्यक्रमाचे उदघाटक चित्राताई डांगे जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस व कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूरेड्डी शहर अध्यक्ष घुग्गूस काँग्रेस हे होते.
प्रमुख अतिथी सौ.नम्रता ढेमस्कर प्रदेश सचिव महिला काँग्रेस, सौ.संगीताताई बोबडे या होत्या कार्यक्रमाचे उदघाटन राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रम शुरू करण्यात आले.
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील जवळपास 400 ते 450 महिलांनी सहभाग घेतला.
उपस्थित महिलांची ओटी भरूण वाण वाटप केले.
महिलांना संबोधीत करतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष व महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे यांनी महिलांवर वाढलेल्या अत्याचारा विरोधात चिंता व्यक्त करीत महिला सक्षमीकरणा बाबत जनजागृतीपर विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उदघाटीका महिला प्रदेश सचिव नम्रता ठेमस्कर यांनी महिलांना कुटुंब सांभाळीत राजकारणात पुढे यावे प्रत्येक अन्याय,अत्याचारा विरोधात भस्मासूरा सारख्या वाढलेल्या महागाई विरोधात महिलांनी पुढाकार घेण्याचा आवाहन केले.
काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी महिलांना स्वयंरोजगारातुन व्यवसाय उभे करण्या संदर्भात मार्गदर्शन करून आपल्यापरीने भरघोस मददतीचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रस्ताव सौ.पुष्पा नक्षिणे यांनी केले.
तर सूत्र संचालन चैताली गोहोकार यांनी केले तर
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सौ.माधुरी ठाकरे,सौ. सरिता गोहोकार,सौ. राजश्री बोबडे,सौ.शुभांगी नांदे,सौ. स्नेहा बांदूरकर,सौ. सुनिता राखुंडे यांनी केले आहे.

Previous articleविदर्भवीर शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्राचे नेते मा_आमदार_कै_भाई_के_आर. पाटील_यांची_जयंती_निमित्त
Next articleनिटूर ग्रामपंचायत भ्रष्टाचार चौकशीची मागणी