Home Breaking News निटूर ग्रामपंचायत भ्रष्टाचार चौकशीची मागणी

निटूर ग्रामपंचायत भ्रष्टाचार चौकशीची मागणी

250

 

(लातुर/निलंगा) प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

जाहिराबाद लातूर महामार्गाचे काम सुरु आहे. यात रस्त्यालगत असलेल्या पाईपलाईनचे मोठे नुकसान झाले. संरपचाने हे पाईप बदलून नवीन पाईप त्या ठिकाणी लावत ते पाईप शासकीय रक्कमेतून खर्च दाखवल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते यशवंत पवार यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे.
निलंगा तालूक्यातील निटूर ग्रामपंचायतीने महामार्गावरील पाईपलाईनचा अपहार केला आहे. ही पाईपलाईन अवजड वाहनामुळे फुटली होती. ती पाईपलाईन कंत्राटदाराने दुरुस्त करून दिली. मात्र यात ग्रामपंचायतने नवीन पाईपलाईनसाठी शासकीय खर्चातून दुरुस्त केली आहे असे पवार यांचे म्हणने आहे.
निलंगा तालूक्यातील मोठी ग्रा. पं. म्हणून निटूरकडे पाहिले जाते माञ या ग्रा. पं. चा कारभार याना त्या कारणामुळे सतत चर्चेत असतो .जहिराबाद निटूर लातूर या महामार्गाचे काम तीन वर्षापूर्वी सुरू झाले होते. त्यामुळे एक दोन ठिकाणी पाईप लाईन अवजड वाहनामुळे फुटली होती आणि ती कंपनी ने दुरूस्त ही करून दिली होती. माञ ग्रा. पं. ने महामार्गाचे काम करणाऱ्या शिंदे डेव्हलपर्स या कंपनी ला पञव्यव्हार करून तुमच्या वाहनामुळे अनेक ठिकाणी पाईप लाईन फुटली आहे असे सांगून एकूण तीन हजार फूट पेक्षा जास्त पाईपलाईन तसेच रेड्युसर वाॕल दहा अशा प्रकारचे साहित्य कंपनीकडून फुकटात घेतले होते. त्याचा वापर सरपंचाने वैयक्तिक फायद्यासाठी करून काही पाईप शासकीय योजनेत वापरून सरकारी निधी हडप केला असल्याचे तक्रातीत म्हटले आहे. तसेच घेतलेल्या साहित्याची नोंद साठा रजिस्टर मध्ये ही करण्यात आली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे .
दरम्यान घेतलेले सर्व पाईप एकतर स्वतः च्या वैयक्तिक कामासाठी वापरले आहे आणि कांही शासनाच्या योजनेत हेच पाईप वापर करून शासनाची फसवणूक केल्याचे तक्रारदार पवार यांनी म्हटले आहे त्यामूळे शासनाने एक समिती नेमून अपहार करणाऱ्यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे .

Previous articleहळदी – कुंकू कार्यक्रमातुन महिला सक्षमीकरणाचा “,नारा’
Next articleराज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केली लोणार सरोवराची पहाणी