Home Breaking News राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केली लोणार सरोवराची पहाणी

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केली लोणार सरोवराची पहाणी

355

 

अनिलसिंग चव्हाण सह विकी वानखेडे

बुलडाणा = लोणार सरोवर हा आमचा अमूल्य ठेवा आहे. या परिसराचा चांगला विकास झाल्यास हजारो नाही तर लाखोंच्या संख्येने देश विदेशातील पर्यटक या सरोवराला पाहण्यासाठी येतील. त्यामुळे येथील आर्थिक स्थिती सुधारेल लोणार सरोवराच्या विकासासाठी यशोचीत कार्य झाले पाहिजे अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल हे आज शुक्रवार, दि.४ फेब्रुवारी रोजी ‘बुलडाणा’ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी जगप्रसिद्ध लोणार सरोवराला भेट दिली. या सरोवरासंदर्भाची माहिती जाणून घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उपरोक्त अपेक्षा व्यक्त केली.

अ’ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून लोणार सरोवर ओळखलं जातं. भूगर्भशास्त्र खगोलिय अभ्यासासह जैविविधतेचा अभ्यास करण्यासाठी लोणार सरोवराचे वैज्ञानिक महत्त्व सर्वश्रृत आहे. बेसॉट खडकापासून निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर जगविख्यात आहे जैविविधतेच्या दृष्टीनेही लोणार सरोवराचे महत्त्व आहे. महाराष्ट्रातील सर्वात छोटे पक्षी अभयारण्य म्हणूनही त्याचा उल्लेख केला जातो. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या लोणार सरोवराचा विकास झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous articleनिटूर ग्रामपंचायत भ्रष्टाचार चौकशीची मागणी
Next articleएका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी सरपंच परिषदच्या पोलीसांना निवेदन