Home Breaking News एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी सरपंच परिषदच्या पोलीसांना...

एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी सरपंच परिषदच्या पोलीसांना निवेदन

1274

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

यावल तालुक्यातील एका गावातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातील आरोपींवर कठोर फाशीची शिक्षा व्हावी, अश्या मागणीचे निवेदन सरपंच परिषद यांच्यातर्फे यावल पोलीस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक जितेन्द्र खैरनार यांना शुक्रवार ३ फेब्रुवारी रोजी सकाळी  देण्यात आले आहे.

यावल तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय मुलगी आपल्या नातेवाईक व कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार २६ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही शौचालयासाठी गावातील रोडवर एकटी गेली होती. त्यावेळी गावातील दोन अल्पवयीन मुले व एका तरूण यांनी अल्पवयीन मुलीचे तोंड दाबुन शेजारच्या शेतात ओढून नेले व तिच्यावर सामुहिक अत्याचार केला. या घटनेतील तीनही संशयित आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी यासाठी खटला फास्ट कोर्टात मार्फत विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, आणि पीडीत मुलीला आर्थीक मदत देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना शुक्रवार ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता देण्यात आले.

या निवेदनावर सरपंच परिषद तालुका सचिव अजय अडकमोल, तालुका उपाध्यक्ष सैय्यद असद सैय्यद जावेद, तालुका उपाध्यक्ष भूषण पाटील, माहिला तालुकाध्यक्ष अलका पाटील, वढोदे सरपंच संदीप सोनवणे, अजय भालेराव, प्रदीप कोळी, नवाज तडवी, निलेश कोळी, वर्षा कोळी, समाधान पाटील, रामकृष्ण सोळंके, दिपक चौधरी, गोपाळ सोळंखे, युवराज पाटील, सुनिल कोळी, आधार खडके, राहूल झगडे, अरूण माळी, विकास सोळंखे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous articleराज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केली लोणार सरोवराची पहाणी
Next articleघुग्घुस येथे श्री. शिवमार्कंडेय महामुनी मूर्ती प्राणप्रतिष्ठान कार्यक्रम संपन्न