अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक
खांमगाव – अपर पोलीस अधीक्षक खामगांव , यांना आज दि.५/फेब्रुवारी रोजी गुप्त माहिती मिळाली कि ,स्कूटी क्रमांक MH-28 AH-1606 वर देशी दारुची कोलोरी ते खामगांव मार्गावर अवैध वाहतूक होत आहे. त्या प्रमाणे अपर पोलीस अधीक्षक खामगांव यांचे आदेशा प्रमाणे पथकातील पोलिस अंमलदार पो. हे. काॕ. गजानन बोरसे, पोलीस नाईक गजानन आहेर , रघुनाथ जाधव , संदिप टाकसाळ , पोलीस कॉन्स्टेबल राम धामोडे यांनी पिंप्री गवळी फाटा येथे नाकाबंदी करुण सदर वाहन पकडून वाहनावरील 5 पेटी देशी दारू किंमत 15हजार रुपये वाहन ,व वाहन बाॕटलसह सह 53 हजार 40/- चा मुद्देलाम जप्त करुण आरोपी विरुद्ध पो. स्टे .खामगांव ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्रस्तुत कारवाई श्री . अरविंद चावरिया ( भा.पो.से. ) पोलीस अधीक्षक , बुलडाणा यांचे मार्गदर्शनाखाली श्रवण दत्त एस , अपर पोलीस अधीक्षक , खामगांव यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय , खामगांव यांचे पथकातील पोलीस पोलीस अंमलदारांनी केली आहे.