इन वृत्तसेवा सतीश मुलंगेलोणार दि 6फेब्रु २०२२
मविद्या सरकारने विद्यार्थ्यांच्या जिवनाशी खेळणारा विद्यापीठ स्वायत्ततेवर गदा आणणारा काळा कायदा रद्द करावा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांचेकडे लोणार भेटी दरम्यान निवेदनाद्वारे केली आहे.
उच्च शिक्षण क्षेत्रात प्रागतिक पुरोगामी व सदैव प्रयोगशील म्हणून महाराष्ट्र राज्याची राष्ट्रीय पातळीवर प्रतिमा आहे राज्यात नुकताच करण्यात आलेली विद्यापीठ कायद्यातील दुधारणा राज्यातील विद्यापीठाच्या स्वायत्ततेला राजकीय हस्तक्षेपाचा धोका निर्माण करणारा आहे यामुळे विद्यापीठ स्वायत्ततेवर गदा येणार आहे. दिनांक १५ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाने
विद्यापीठ स्वायत्ततेवर स्वतः चे नियंत्रण आणण्यासाठी विद्यापीठ कायद्यात बदल करत काही निर्णय घेत मंकीमंडळात मंजुर केले आहेत. सदर प्रस्तावित निर्णयाचे येत्या अधिवेशनात कायद्यात रूपांतर करण्याचा महाराष्ट्र सरकारचा डाव आहे, या निर्णयानुसार राज्या अंतर्गत असलेल्या सर्व विद्यापीठाचे कुलपती हे राज्यपाल असुन देखिल कुलपतींची थेट नियुक्ती गुरु शकणार नाहीत. राज्य सरकारने सुचविलेल्या नावापैकीच कुलगुरूची निवड राज्यपालाना छरावी लागणार आहे. प्र. कुलगुरू करून हे पद निर्माण त्यावर राज्याचे उच्च व तंशिक्षण मंत्री यांची नियुक्ती केली जाणार आहे. हे बदल म्हणजे राज्यातील विद्यापीठा च्या स्वायत्ततेवर घाला घालणारे आहेतया निर्णयामुळे विद्यापीठांच्या कामकाजात अवाजवी राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता अधिक आहे. सर्व विद्यापीठाचे प्रमुख असलेल्या राज्यपालांच्या अधिकारां ● ना कमी करण्याचा हा प्रयत्न राज्य सरकार कडून होत आहे या बाबीचा विद्यापीठातील गुणवत्ता धारक विद्यार्थी,
प्राध्यापक यांचेवर होणार आहे. यामुळे उच्च शिक्षणाचा दर्जा धरण्याची घसरण्याची भिती आहे म्हणून हा कायदा रद्द करावा अशी मागणी देशमुख यांनी लोणार एम. टी. डी.सी. येथे निवेदन देक व्दारे केली आहे.
यावेळी देशमुख यांचेसोबत भाजयुमो जिल्हा
उपाध्यक्ष सुंदर संचेती, तालुकाध्यक्ष शुभम बनमक, शहराध्यदन दिपक चौधरी जिल्हा कार्यकारिणी सदस्य किरण जोशी, विनोद योखे आदि कार्यकर्ते उपस्थित होले