Home Breaking News पातुडाँ येथील विशाल जम्मा जगरण संपन्न

पातुडाँ येथील विशाल जम्मा जगरण संपन्न

411

 

संग्रामपुर तालुक्यातील पातुडाँ बु येथे रामदेवबाबा यांच्या जीवन पाटावर जम्मा जागरण संपन्न झाला असून हजारो भक्तांनी यांचा लाभ घेतला
राजस्थान राज्यातील रामदेवरा नगरी मध्ये रामदेवबाबा बाबा याचे भव्य मंदिर आहे रामदेव बाबा याना माननारा वर्ग देशातील कान्या कोपऱ्यात असून पातुरडाँ येथे पण आहे,पातुडाँ येथील रामदेवबाबा सेवा समिती कडून माघ महिन्याच्या वसंत पंचमी निमित्य दि 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता पासून बालाजी मंदिर मध्ये विशाल जम्मा जागरण चे आयोजन प्रसिद्ध जम्मा गायक गोपाल शर्मा हारे अकोला यांच्या मधुर वाणीतून करण्यात आले होते सर्वप्रथम सकाळी बालाजी मंदिर मध्ये अभिषेक,पूजा अर्चना,मंत्रोउच्च्यार सह पंडीत यांच्या कडून करण्यात आले तर राजस्थानी महिला मंडळ यांनी सुदरकांड चे आयोजन केले होतें या कार्यक्रम ला आलेल्या भक्तांना सकाळी व सायंकाळी महाप्रसाद देण्यात आला अखंड ज्योत चे भक्तांनी दर्शन घेतले
या जम्मा जागरण चा हजारो भक्तांनी लाभ घेतला,जम्मा जागरण मध्ये अखंड ज्योत,भजन संध्या,अखंड होम,रामदेव बाबा यांचे चमत्कार हे सर्व दाखविण्यात आले या जम्मा जागरण ला आलेले प्रसिद्ध गायक गोपाल शर्मा हारे यांचा व त्यांच्या सर्व टीम चा रामदेवबाबा समिती पातुडाँ बु कडून शाल,श्रीफळ व हार टाकून सत्कार करण्यात आला या जम्मा जागरण मध्ये वानखेड, कवठल,सगोडा, शेगाव, खामगाव, वरवट बकाल, संग्रामपुर, खेरडा, जळगावजामोद,आसलगाव,तेल्हारा,अडगाव बु,अकोट, अकोला,यवतमाळ, माटरंगाव,काटोल,मोर्शी,अअश्या बऱ्याच शहरातून भक्त आले होते,गोपाल शर्मा यांनी सांगितले की रामदेवबाबा या कलयुगातील सर्व धर्म,जात पंतांचे देव आहेत,त्यांना आसा कोणताही समाज नाही जो मानत नाही प्रत्येक समजातील घरात त्याचा फोटो आहे व दररोज त्याच्या फोटोची पूजा करतो सर्व समाज,रामदेवबाबानी आपल्या जीवनात कोण कोण ला साक्षात चमत्कार दिला त्याचे सर्व किस्से सांगितले व सोबतच भजन संध्या करून भक्तांना त्याच्या गाण्यावर थिरकविले व त्याची आरती करून जम्मा जागरण संपन्न केला

कार्यक्रम मधील झाकीया

मदन तापडिया व सौ कांचन तापडिया(रामदेव बाबा चे आई,वडील) कु समर्थ न्यानेश्वर धर्माळ(लहान रामदेव बाबा),अक्षय अग्रवाल सौ शिवानी अग्रवाल(मोठे रामदेवबाबा व त्यांच्या पत्नी नेतलबाई),सौ शीखा निलेश चांडक व सौ उजवला संजय चांडक(ला छाबाई,सुगनाबाई,रामदेवबाबा च्या बहीनी),अनुष्का व्यास(डालीबाई),पियुष चांडक(भानू),विधी राठी-स्वरस्वती,रिया गांधी-लक्ष्मी,गौराग भुतडा-गणेश या प्रकारच्या झाकी तयार करण्यात आल्या होत्या व गणेश राठी,लोकेश राठी,शरद राठी,प्रदीप राठीं,दामोदर राठी, कमल राठी,विष्णू गांधी,मुन्ना गांधी,सुरेश अग्रवाल,हरीश तापडिया, मदन तापडिया, प्रकाश दवे,अजय व्यास,सतीश शर्मा,निखिल चांडक,रमेश चांडक,आईदान चांडक,शिवकुमार चांडक,लतीश भूतडा,दामोदर भुतडा, हेमंत भुतडा, आनंद वर्मा,मनीष शर्मा,कृष्णा भुतडा, रमण सेवक, संजय चांडक,रामचंद्र राठी, निलेश चांडक,भगवान राठी,महेश गोयल,मनीष पालिवाल, सुरेश पालिवाल, कृष्णा चांडक, दिनेश चांडक, सुरेश चांडक,आकाश पालिवाल,लोकेश पालिवाल याच्या सहकार्यने कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला

नरेश बाबा यांची विशेष उपस्थिती
पांढरी धाम येथील रामदेव बाबा यांच्या मंदिर चे मुख्य व महंत श्री नरेश बाबा यांची पातुडाँ येथील जम्मा जागरण ला विशेष उपस्थिती लाभली होती त्याचा रामदेवबाबा सेवा समिती कडून सत्कार करण्यात आला व भक्तांना दर्शनाचा लाभ भेटला

Previous article
Next articleयावल येथे उद्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजीत शरद युवा संवाद यात्रेचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आगमन