Home बुलढाणा जानोरी ग्रामपंचायत चा उपक्रम स्वनिधीतून 26 दिव्यांगांना सौर कंदील वाटप

जानोरी ग्रामपंचायत चा उपक्रम स्वनिधीतून 26 दिव्यांगांना सौर कंदील वाटप

308

 

शेगांव प्रतिनिधी अर्जुन कराळे

शेगाव : तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतच्या वतीने स्वनिधीतून स्वामी रामभारती महाराज यांचेहस्ते गावातील 26 दिव्यांगांना सौरकंदील वितरित करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ अर्चना मंगेश ढोले ह्या होत्या
यावेळी उपसरपंच शंकर रामदास सोळंके , ग्रा प सदस्य नंदाकिशोर गावंडे, रमेश डांगे, सौ लता घेंगे , सौ सुरेखा घेंगे, सौ दुर्गा बोरसे, सौ दिक्षा भोजने, शेख रेहाना यांच्या उपस्थिती होती.
दीन दुबळ्यांची व गरजूंची सेवा हीच खरी ईश्वरी सेवा असून ग्रामपंचायत प्रशासनाकडून असेच लोकहितार्थ उपक्रम गावात सातत्याने राबवायला हवे,लोकहित साधणे हेच लोकप्रतिनिधी चे कार्य असल्याचा उपदेश करून ग्रा प च्या उपक्रमांची प्रशंसाही स्वामी रामभारती महाराज यानी यावेळी मनोगतातून केली.आभार ग्रा प सचिव आर पी गावडे मानले.

Previous articleयावल येथे उद्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजीत शरद युवा संवाद यात्रेचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आगमन
Next articleघुग्घूस चे पद्मशाली समाज चा वतीने शिवमार्कंडा जयंती निमित्त महामुनी मार्कंडय्या ची मुर्ती स्थापना करण्यात आली ।