Home Breaking News मोटार सायकल चोरीची टोळी केली जेरबंद 17 मोटार सायकल जप्त स्थानिक गुन्हे...

मोटार सायकल चोरीची टोळी केली जेरबंद 17 मोटार सायकल जप्त स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा पथकाची कामगिरी

651

 

शेगांव प्रतिनिधी अर्जुन कराळे

जिल्हयातील दुचाकी चोरीच्या गुन्हयात झालेली वाढ रोखण्यासाठी व सदरचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्यासाठी श्री अरविंद चावरीया, पोलीस अधिक्षक, बुलडाणा व श्री श्रवण दत्त, प्रभारी पोलीस अधीक्षक, बुलडाणा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांना आदेशीत केले होते. श्री बळीराम गिते, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांनी त्यांचे अधिनस्त पथकास सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना केल्या होत्या.

आज रोजी सदर पथकास गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, शेख शाहरुख शेख फिरोज, रा फर्शी मस्जीदच्या पाठीमागे शेगांव ता शेगांव जि बुलडाणा हा चोरीची मोटार सायकल विक्री करण्याच्या बेतात आहे अशी माहिती प्राप्त होताच पथकाने सापळा रचून त्यास व त्यांचा साथीदार शेख मोबीन शेख हारुन, रा धनगर फैल रेल्वेगेट जवळ, शेगांव ता शेगांव जि बुलडाणा या दोघांना ताब्यात घेवून कौशल्यपूर्ण विचारपूस केली असता पुढील प्रमाणे मुद्देमाल जप्त करून कारवाही करण्यात आली आहे.

> जप्त करण्यात आलेला मुदेमाल: 14 मोटार सायकल, 1 मोटार सायकलचे चेसीस, गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या 02 मोटार सायकल व गुन्हयात वापरलेले 04 मोबाईल फोन, चाबीचा गुच्छा 100 overline x , असा एकुण 8,50,100/रुपये

> चोरीच्या मोटार सायकल गुन्हयात सहभागी असलेले आरोपी :

1. शेख शाहरुख शेख फिरोज, रा फर्शी मस्जीदच्या पाठीमागे ता शेगांव जि बुलडाणा 2. शेख मोबीन शेख हारुन, रा धनगर फैल रेल्वेगेट जवळ, ता शेगांव जि बुलडाणा

3. अमान खान असलम खान रा धनगरनगर अकोट रोड, शेगांव ता शेगांव जि बुलडाणा 4. मुन्शिफ खान अल्ताफ खान, रा कच्छी मस्जीद जवळ शेगांव ता शेगांव जि बुलडाणा

• उघडकीस आलेले गुन्हे :

1. पोस्टे. शेगांव शहर अप न. 19/22 क.379 भादवी पोस्टे. शेगांव शहर

2. पोस्टे. शेगांव शहर अप न. 665/21 क.379 भादवी

3. पोस्टे. शेगांव शहर अप न. 715/21 क.379 भादवी

4. पोस्टे शेगाव ग्रामीण अप न. 25 / 2022 कलम 379 भांदवि

नमुद आरोपीतांनी अकोला तसेच बुलडाणा जिल्हात मोटरसायकल चोरी केल्याचे कबुली दिलेली आहे. सदरच्या मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत overline qY नमुद अप.नं. वगळता उर्वरित जप्त गाडयांचे चेसीस व इंजीन नंबर वरून सदर गाडीचा खरा नंबर निष्पन्न करून उर्वरित गाडयांमध्ये दाखल असलेले गुन्हयाबाबत अभिलेख तपासून माहिती घेणे सूरू आहे.

नोट शेगांव परीसरातील मागील 2 वर्षामध्ये ज्यांच्या मोटरसायकल चोरीस गेलेल्या आहे त्यांनी शेगांव पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री अनिल गोपाळ, पोलीस निरीक्षक – 9881866767 यांच्याशी संपर्क साधावा.

कार्यवाही पथक

सदरची कामगिरी श्री अरविंद चावरीया, पोलीस अधिक्षक, बुलडाणा व श्री श्रवण दत्त, प्रभारी पोलीस अधीक्षक, बुलडाणा, श्री बजरंग बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक, बुलडाणा श्री अमोल कोळी, उप विभागीय पोलीस अधिकारी, खामगांव, जि बुलडाणा श्री बळीराम गिते, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा यांचे मार्गदर्शनात श्री विलासकूमार सानप, सपोनि, श्री निलेश शेळके, पोलीस उप निरीक्षक श्री श्रीकांत जिंदमवार, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अमंलदार सुधाकर काळे, पुरुषोत्तम नारायणराव आघाव, अजीस रहेमान परसुवाले, दिपक मनसुबराव वायाळ, रवी भिसे, राजू आढवे यांनी पार पाडली आहे.

 

Previous articleWcl वेकोली क्वार्टरच्या कुजलेल्या इलेक्ट्रिकल वायरिंग बदलावा : राजूरेड्डी
Next articleमहाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदुरा गाव तेथे शाखा घरतेथे कार्यकरता अभियान अनतरगत सोमवारी आढावा बैठक