काँग्रेस कार्यलयात शाल – श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
( चंद्रपूर घुग्गूस) प्रतिनिधि
रमेश सुध्दाला
घुग्गूस : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अंतर्गत कार्यरत उत्तर भारतीय सेल तर्फे मुंबई येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ब्रिजेश सिंग यांना उत्तर भारतीय प्रदेश सचिव पदावर नियुक्ती करण्यात आले.
सिंग यांच्या घुग्गूस आगमना निमित्त शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यलयात शहर अध्यक्ष राजूरेड्डी, अजय पाटील, शैलेंद्र वनकर, यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर,रोशन दंतलवार,विशाल मादर,रोहित डाकूर,विजय माटला,सुकुमार गुंडेटी,बालकिशन कुळसंगे,कपिल गोगला,आरिफ शेख,सुनील पाटील, रफिक शेख,संजय कोवे, कुमार रुद्रारप,प्रदीप आसेकर,अंकुश सपाटे,रंजित राखुंडे
व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.