Home Breaking News लोणार सरोवर परिसरातील शेतातील कोरड्या विहिरीत आढळला बिबट

लोणार सरोवर परिसरातील शेतातील कोरड्या विहिरीत आढळला बिबट

237

 

जगन मोरे लोणार प्रतिनिधि

जागतिक कीर्ती प्राप्त लोणार सरोवरच्या चारही बाजूने घनदाट वृक्ष असल्याने लोणार सरोवरास लोणार अभयारण्य दर्जा प्राप्त असून सदरील अभयारण्यात विविध प्रकारचे प्राणी वास्तवास असून लोणार अभयारण्य मधील एक बिबट लोणार सरोवराच्या काठावरील नगर सेवक गुलाब सरदार यांच्या शेताजवळील एका कोरड्या अंदाजे २० फुट असलेल्या विहिरीत बिबट्या पडल्याने सदर बिबट्या याने डरकाळी मारल्या मुळे त्याचा आवाज एकूण शेजारील शेतातील नगर सेवक गुलाब सरदार यांनी कोरड्या विहिरी जवळ येवून पाहणी केली असता सकाळी १०.०० वाजेच्या दरम्यान कोरड्या विहिरीत एक बिबट्या असल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर त्यांनी सदर बाब ही वनविभागातील अधिकारी यांना कळवताच वनविभागाचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष स्थळी येवून पाहणी करून बुलडाणा येथील रेस्कू टीमला एका कोरड्या विहिरीत वन्यप्राणी बिबट पडला असल्याबाबत कळविताच रेस्कू टीम यांनी सदर ठिकाणी धाव घेऊन बिबट्यास काढण्या करीता रिस्कू करून सीडीच्या द्वारे बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतेवेळेस बिबट्या याने सिडीद्वारे विहिरीच्या बाहेर येवून पळ काढला. अश्या प्रकारे वनविभागाच्या बुलडाणा येथील रिस्कू टीमने एका बिबट याचे सुखरूप प्राण वाचविले आहे. सदर बिबट्या पाहण्या करीता लोणार शहरातील तसेच आजूबाजूला असणाऱ्या शेतकरी यांनी गर्दी केली असून गर्दीमुळे तेथे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये. त्यासाठी लोणार पोलीस स्टेशन ठाणेदार प्रदीप ठाकूर हे घटनास्थळी त्यांचा पोलीस बांधवासह उपस्थित होते. तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी प्रत्यक्षस्थळी येवून पाहणी केली. बुलडाणा रेस्कू टीम मध्ये समाधान मांटे वनरक्षक, प्रविण सोनुने, पवन वाघ, सागर भोसले, दिपक गायकवाड, संदीप माळवी वाहन चालक तसेच लोणार येथील रेंजर पी. डी. सावळे, आर.एफ.ओ. सुशांत पाटील, कायंदे वनपाल, चौधरी वनरक्षक, विणकर वनरक्षक, वाहन चालक पवार या वनविभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नाने अखेर दुपारी २.३० वाजेदरम्यान बिबट बाहेर काढण्यास यश मिळविले. यादरम्यान बिबट हा साडेचार घंटे कोरड्या विहिरीत असून सुद्धा कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. यामुळे तिथे उपस्थितांनी वनविभाग कर्मचारी यांचे आभार मानले.

Previous articleसहायक पोलीस निरिक्षक मिलन बाळकृष्ण कोयल याचा संत्कार उषा पानसरे याचा हस्ते
Next articleकृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जा च्या आर्थिक नुसकानास कारणीभुत ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात चौकशी करून कार्यवाही करण्याबाबत तक्रार दाखल,,