जगन मोरे लोणार
तांबाळा येथील समाज बांधवांकडून श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली संत रविदास महाराज यांची शिकवण ही तत्कालीन समाज व्यवस्थेतील तळागाळातील शेवटचा घटक सुखी व्हावा,जातीय आणि सामाजिक सलोखा निर्माण व्हावा,अशीच विचारधारा,मानवतावाद, बंधुत्ववादी विचार प्रिय होते.अश्या या महान संताची आज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
तांबोळा येथील संत रोहिदास महाराज मित्र मंडळ अध्यक्ष आकाश सरसरे,उपाध्यक्ष अमोल सरसरे,सदस्य समाधान सरसरे,भगीरथ सरसरे,राहुल सरसरे,सिताराम सरसरे,रोहिदास सरसरे,नितीन सरसरे,विजय सरसरे,संतोष सरसरे,सुमित सरसरे
यांनी ग्रामपंचायतला संत रविदास महाराज यांची प्रतिमा भेट दिली,यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच रवि राठोड,ग्रामपंचायत सदस्य उध्दव आटोळे, प्रकाश जाधव,गणेश सरसरे,समाधान सरसरे, विठ्ठल खरात,राहुल मोरे विकास सरसरे,बाबुलाल सरसरे,गजानन सरसरे इतर गावकरी मंडळी हजर होते.