उषा पानसरे मूख्य.का. संपादक मो,9921400542
असदपूर!
अचलपूर तालुक्यातील असदपूर येथील नरेंद्र येऊतकर यांच्या निवासस्थानी चर्मकार समाजाचे आराध्य दैवत जगद्गुरु संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६४६ वी जयंती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष निलेश जामठे यांच्या मार्गदर्शनात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असदपूर ग्रामपंचायत सरपंच सौ.ममताताई येऊतकर या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष आकाश देऊळकर सामाजिक कार्यकर्ते अ.कलाम शे.हसन हे होते. यावेळी संत रविदास महाराज यांच्या फोटोचे पूजन व हारार्पण करून सर्व समाज बांधवांनी अभिवादन केले. यावेळी दीपक तायडे,प्रमोद चांगोले,विशाल चांगोले, संजय सावळे गिरीश चापके,निलेश चापके आदीसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.