Home जळगाव यावल तालुक्यातील अतिक्रमीत जागा व दलित वस्ती सुधार योजनेच्या निधी अंतर्गत झालेल्या...

यावल तालुक्यातील अतिक्रमीत जागा व दलित वस्ती सुधार योजनेच्या निधी अंतर्गत झालेल्या गोंधळा विषयी निळे निशानची निदर्शने

654

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

यावल पंचायत समिती अंतर्गत शासनाकडुन मिळणाऱ्या वंचीत गरजु लोकांच्या विविध समस्या तसेच तालुक्यात अनेक कुटुंब ही आज ही अतिक्रमीत जागेत आपत्या कुंटुबास वास्तव्यास असुन त्यांची अतिक्रमीत घरे कायम गाव नमुना ८ला लावुन त्यांना घरकुलांचे लाभ देण्यात यावे तसेच दलीत वस्ती सुधार योजनांचा निधीचा तालुक्यात मोठया प्रमाणावर गैर उपयोग होत असल्याच्या व विकास कामात होत असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विरोधात आज यावल पंचायत समिती समोर निळे निशान या सामाजीक संस्थेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आंनद बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय निर्दशने करण्यात आली, गटविकास अधिकारी यांनी येत्या आठ दिवसात सदरच्या मागण्याकडे लक्ष देवुन समस्या न सोडविल्यास या ठीकाणी पुनश्च मोठया प्रमाणावर आंदोलन करण्यात येइल असा ईशारा संस्थेच्या वतीने देण्यात आला असुन , याप्रसंगी निळे निशान संस्थेच्या नियोजन विभागाचे जिल्हाध्यक्ष महेश तायडे, सामाजीक व रोजगार विभागाचे जिल्हा अध्यक्ष युवराज सोनवणे , जिल्हा नियोजन उपप्रमुख सदाशिवनिकम, जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे , फैजपुर विभागाचे अध्यक्ष भगवान आढाळे, तालुका अध्यक्ष विलास भास्कर तालुका उपाध्यक्ष अब्दुल सलाम , युवकचे तालुका अध्यक्ष विशाल तायडे , प्रमोद पारधे , सुभाष तायडे , गणेश भालेराव , लक्ष्मीताई मेढे यांच्यासह मोठ्या संख्येत महीला व कार्यकर्ता याप्रसंगी उस्थित होते, संस्थेच्या वतीने पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी मागण्या संदर्भातील विविध योजनांची सद्य स्थिती ची माहीती त्यांनी दिली व प्रशासनाच्या वतीने योग्य तो निर्णय घेण्यात येवुन समस्या सोडविण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले .

Previous articleस्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन
Next article, मे आणि जून महिन्यांमध्ये झालेल्या वादळामुळे शेतकऱ्यांचे केळी पिकाचे प्रचंड नुकसान झाले