(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला
नकोडा गावातील निराधार महिलांना श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून मासिक निराधार राशी मिळण्यावून देण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले. नकोडा गावातील निराधार महिलांना श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळण्यास चंद्रपूर चे पालकमंत्री मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांचा मार्गदर्शनाखाली विजय वडेट्टीवार फ्यांस क्लब अध्यक्ष प्रवीणभाऊ लांडगे व कॉंग्रेस कार्यकर्ते सुनील भाऊ जुमनाके यांनी महिलांना श्रावण बाळ योजना प्रमाणपत्र मिळून दिले. योजनेचे लाभार्थी विमलाबाई वानखेडे, मुक्ताबाई पाटील, लताबाई सोनटक्के, कमलबाई पाटील, अब्दुल रफिक यांना योजनेचे प्रमाणपत्र सुपूर्त केले.