Home Breaking News यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते झाले शिवरायांसमोर नतमस्तक आमदार किशोर जोरगेवार यांनी केली...

यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते झाले शिवरायांसमोर नतमस्तक आमदार किशोर जोरगेवार यांनी केली शिवरायांना मानवंदना

321

 

(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिवरायासमोर नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन केले.
आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. या निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनेही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्याण छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शिवरायांना माल्यार्पण करीत महराजांना अभिवादन केले. यावेळी आ. जोरगेवार म्हणाले कि, रयतेच्या मनातील सुराज्य स्थापन करणारे शिवराय हे जाज्वल्य देशभक्तीचे प्रतिक होते. त्यांच्या राज्यात जनता सुखावह होती. सर्व धर्मांना समान न्याय ही त्यांच्या राज्य कारभाराची विशेषता होती. त्यामुळेच आज ३९२ वर्षांनंतरही त्यांच्या विचारांची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले, या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, युवती प्रमूख भाग्यश्री हांडे, युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सलीम शेख, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, अल्पसंख्याक विभागाचे शहर युथ अध्यक्ष राशेद हुसेन, विलास वनकर, सायली येरणे, कौसर खान, सविता दंडारे, दुर्गा वैरागडे, माला पेंदाम, वैशाली मेश्राम, विलास सोमलवार, विनोद अनंतवार, गौरव जोरगेवार, नकुल वासमवार, विश्वजित शाहा, आनंद रणशूर, तापोष डे, राम जंगम, दत्तू गवळी, रुपेश पांडेय, कल्पना शिंदे आदिंची उपस्थिती होती.

Previous articleशिवजयंती दिनी काँग्रेसतर्फे मोदींचा जाहीर निषेध
Next articleसरकारचा अंकुश नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक : संभाजी निलंगेकर