Home चंद्रपूर लायड्स मेटल्स कामगारांचे तीन महिन्यांचे थकीत वेतन काँग्रेस अध्यक्ष राजु रेड्डी ने...

लायड्स मेटल्स कामगारांचे तीन महिन्यांचे थकीत वेतन काँग्रेस अध्यक्ष राजु रेड्डी ने मिळवून दिले

283

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : येथील लायड्स मेटल्स कंपनीत पाईप लाईनचे काम हे एस. जे.इंजिनिअरिंगचे संचालक जे.पी.यादव यांनी घेतले.
व या कामाकरिता चंद्रपूर – गडचिरोली येथील मजुरांना कामावर ठेवले त्यांना वेतन न देता फक्त अडवांस दिल्या जात होता.
तीन महिन्याचे वेतन थकीत ठेवून कंत्राटदार जे.पी. यादव हा उत्तरप्रदेश येथे निघून गेला व कामगारांचे फोन ही उचलणे बंद केले कामगारांन जवळ जेवणाचे ही पैशे नसल्याने ते हवालदिल झाले सदर कामगारांनी काँग्रेस कार्यलयात जाऊन शहर अध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांची भेट घेवुन आपली व्यथा सांगितले असता रेड्डी यांनी तातळीने कामगारांच्या जेवणाची व्यवस्था करून कामगारांना धीर दिले व लोयड्स व्यवस्थापकाशी संपर्क साधीत कामगारांचे वेतन देण्यास बाध्य केले.
आज दिनांक 21 फेब्रुवारी रोजी लायड्स अधिकारी प्रशांत पुरी यांनी कामगारांचे वेतन चेक द्वारे
दिले.
वेतन मिळाल्या नंतर सर्व कामगारांनी काँग्रेस कार्यलयात जाऊन काँग्रेस नेत्यांचे आभार मानले.
यापूर्वी ही काँग्रेस नेत्यांनी अनेक मजुरांना वेतन मिळवून दिले आहेत.

Previous articleआ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
Next articleपूर्णा नगर, जि. प.उर्दू शाळेत शिव जयंती साजरी !