कारंजा (घा )/प्रतिनिधी :पियुष रेवतकर .
कारंजा (घा ).22 जानेवारी
स्थानिय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात 22 जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची 392 वी जयंती साजरी करण्यात आली .अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष शिवश्री सुभाष अंधारे होते तर प्रमुख उपस्थिती ग्रामसेवक संघटनेचे कारंजा तालुका सचिव शिवश्री प्रदीप ताटे यांची उपस्थिती होती .शिवजयंती निमित्य शिवव्याख्यान अखिल भारतीय परिवार पार्टी चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवश्री अरविंद भारतीय यांनी केले .या वेळी सत्कारमूर्ती यांचे संभाजी ब्रिगेड कारंजा तालुका द्वारे सत्कार करण्यात आले या मध्ये कारंजा नगरपंचायत चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष स्वाती भिलकर , नवनिर्वाचित नगरसेवक विशाल इंगळे ,प्राध्यापक डॉक्टर किरण भुयार ,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कारंजा तालूका संघटक तथा शिक्षक राजकुमार तिरभाने ,ग्रामगीताचार्य भारती यावले ,समाजसेविका मंदा नागले यांचे संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले .कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघ कारंजा तालुका कमिटी द्वारा करण्यात आले .शिवाजी महाराजांन वर आधारित नाट्यछटा प्रस्तुत करून समाज प्रबोधन करण्यात आले या नाट्यछटे मध्ये संगीता पाटील ,विनोद पाटील ,सोयरा पाटील ,मनोज वानखेडे ,दशरथ डांगोरे ,जी .डी बोरकर ,कांचन गजभिये व संगीता पाटील यांच्या संचा चा समावेश आहे .छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार काळाची गरज आहे असे मत शिवश्री सुभाष अंधारे सर यांनी अध्यक्ष भाषणातुन व्यक्त केले .. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली इंगळे ,प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष संजय यावले ,तर आभार प्रदर्शन प्रवीण भिसे यांनी केले .कार्यक्रम नंतर उपस्थित लोकांनी जेवणाचा स्वाद घेतला .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवश्री राजेंद्र इंगळे ,शिवश्री प्रवीण भिसे , विदर्भ कल्याणचे तालुका प्रतिनिधी शिवश्री पियुष रेवतकर ,शिवश्री अशोक नागले , शिवश्री विनोद धंदारे ,शिवश्री मंगेश जाचक सर ,शिवश्री उमेश पाचपोहर ,शिवश्री गुणवंता मुळे,शिवश्री सिलवाण ठाकरे ,संभाजी ब्रिगेड चे कारंजा तालुका अध्यक्ष शिवश्री राहुल काळे यांनी परिक्षम घेतले .