उषा पानसरे असदपूर मू.का, सपादक मो.9921400542
दिनाक 26 फेब्रूवारी
अमरावती जिल्ह्यात उत्कृष्ट आरोग्य सेवा प्रदान करणारे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ .श्यामसुंदर निकम यांचा उपजिल्हा रूग्णालय मोर्शीच्या वतीने सपत्नीक सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला . जिल्हा शल्यचिकित्सक डॉ .श्यामसुंदर निकम हे २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होत आहे .मोर्शी उपजिल्हा रूग्णालय चे वैधकिय अधीक्षक डॉ .विनोद चव्हाण सर यांचे मार्गदर्शनाखाली सत्कार व निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ .श्यामसुंदर निकम यांनी मोर्शी उपजिल्हा रूग्णालय येथे जवळपास १५ वर्ष अधीक्षक म्हणून सेवा दिली असून सूत्र संचलन श्रीकांत गोहाड यांनी केले , यावेळी डॉ .सचिन कोरडे , डॉ .विवेक साबळे , डॉ .रावलानी डॉ .सांगोले , डॉ .गजानन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तसेच आरोग्य कर्मचारी विनय शेलूरे , मनीष अग्रवाल , रितेश कुकडे , आशिष पाटील , सुजित वानखेडे , विजय गाढवे , चेतन देशमुख , प्रकाश मंगळे,अमोल राजस,सुनील लेंडे, तुषार पोहोकार,श्री.महल्ले, आशिष नेरकर , अधीपरीचरीका शहाणे , वगारे तसेच उपजिल्हा रुग्णालयात कर्मचारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.