Home चंद्रपूर राजकीय नेत्यांच्या चमकोगिरीत चिमुकल्याचा जीव धोक्यात ?

राजकीय नेत्यांच्या चमकोगिरीत चिमुकल्याचा जीव धोक्यात ?

379

 

प्लस पोलिओ राबविणाऱ्यावर कारवाईची मागणी

(घुग्घुस प्रतिनिधी)
रमेश सुध्दाला

घुग्घुस: शहरात नगरपरिषद निवडणुकीचे पडघम वाजले आहे.
निवडणूकिचा लाभ घेण्यासाठी राजकिय पक्षाचे नेते वेगवेगळ्या युक्त्या लढवीत आहे.
अश्यातच गेल्या काही महिन्यांपासून एका विशिष्ट राजकीय पक्षाचे नेते हे शासकीय योजना अथवा खाजगी उद्योग किंवा त्यांच्या माध्यमातून होत असलेल्या कामाचा श्रेय घेण्यासाठी तळफळत असल्याचे दिसून येत आहे.
घुग्गूस नगरपरिषदेत आग लागली असतांना प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या हातातून पाण्याचा बंब घेवून हे स्वतःच चमकोगिरी करत असल्याचे दिसले होते.
परत त्या घटनेची पुनरावृत्ती वेकोली वसाहतीत लागलेल्या आगीत यांनी केले.
आता तर हद्दच झाली प्लस पोलियो अभियानात वैद्यकीय अधिकारी परिचारिका यांच्या कडून पोलियो ड्रॉप घेऊन लहान – लहान मुलांना कुठल्याही प्रकारे मास्क अथवा सुरक्षितपणा न बाळगता यांनी आपली चमकोगिरी दाखवून चिमुकल्याच्या जीवाशी खेळ केला आहे.
यांच्या राजकिय चमकोगिरीत सहकार्य करणाऱ्या परिचारिका व सहकार्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांत तर्फे होत आहे.

Previous articleघुग्घुस रेल्वे क्रॉसिंग येथे बांधकाम सुरू असलेल्या नवीन पुलीया जवळ दोन सुरक्षा रक्षक नियुक्त करा
Next articleराज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी केली समीरच्या शस्त्रक्रियेस 14 लाखाची मदत