Home वर्धा राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी केली समीरच्या शस्त्रक्रियेस 14 लाखाची मदत

राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी केली समीरच्या शस्त्रक्रियेस 14 लाखाची मदत

557

 

प्रहार रुग्ण सेवा समिती, मुंबई आली धाऊन,उमेश खापरे यांचा पुढाकार.

कारंजा( घा) :-प्रतिनिधी :पियुष रेवतकर.

कारंजा: तालुक्यातील परसोडी येथील मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा गाडा चालविणारे नामदेव कामडी यांचा मुलगा समीर ४ ते ५ वर्षांपासून मणक्याच्या आजाराने त्रस्त होता त्यास नागपूर येथे उपचारार्थ भर्ती केले असता डॉक्टरांनी ९ ते १० लाख रुपये खर्च सांगितला परंतू येवढा मोठा पैसा कुठून आणणार. त्यावेळी त्यांना कोणत्याही योजनेची माहिती नव्हती किंवा कोणी सांगितली नाही आणि तो कोणत्याही योजनेत बसत नव्हता करीता समीरला गावी परत आणण्यात आले.
परंतु समीरला या आजाराचा खूपच त्रास वाढला, ही बाब गावातील माजी सरपंच श्री. दशरथजी पठाडे यांना माहीत पडताच त्यांनी प्रहारचे उमेश खापरे (प्रहार अपंग क्रांती आंदोलन, उपाध्यक्ष वर्धा जिल्हा) यांच्या कानावर टाकली उमेश खापरे यांनी लगेच बच्चुभाऊ कडू यांचेशी संपर्क साधून वरील बाब सांगितली भाऊंनी लगेच मुंबईला जा मी सर्व बघतो असे सांगितले. समीरला मुंबई येथील नामांकित कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मध्ये भरती करुन समिरवर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या त्याचा खर्च १४ लाख रुपये आला असून संपूर्ण शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.
समिरकरीता प्रहार रुग्ण कल्याण समिती मुंबई महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. प्रतापभाऊ तायडे तसेच गोपालभाऊ सुळे, वैभव कर्डीकर, उमेश खापरे हे धाऊन आले.
राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू तसेच प्रहार रुग्ण कल्याण समिती मुंबई हे देवाच्या रुपात येऊन माझा मुलगा समीर कामडी वय १८ वर्ष यास पाठीच्या मणक्याच्या आजार होता आजारावरील उपचाराचा खर्च लाखोच्या घरात असल्यामुळे जो मला कधीच शक्य झाला नसता पण ते बच्चुभाऊ कडु मुळे
शक्य झाले उपचारासाठी प्रहार रुग्ण कल्याण समिती मुंबई अध्यक्ष मा. प्रतापभाऊ तायडे आणि गोपाळभाऊ सुळे, वैभव कर्डीकर, उमेश खापरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Previous articleराजकीय नेत्यांच्या चमकोगिरीत चिमुकल्याचा जीव धोक्यात ?
Next articleहणमंतवाडी मुगाव येथे हमी भावाने हरभरा खरेदीचा शुभारंभ.. !