Home लातूर हणमंतवाडी मुगाव येथे हमी भावाने हरभरा खरेदीचा शुभारंभ.. !

हणमंतवाडी मुगाव येथे हमी भावाने हरभरा खरेदीचा शुभारंभ.. !

169

 

लातुर/निलंगा प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

निलंगा तालुक्यातील हणमंतवाडी मुगाव येथील रानबण ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने शासनाने हरभऱ्याला ठरवून दिलेल्या 5230 प्रमाणे हरभरा खरेदीचा शुभारंभ पत्रकार राजकुमार सोनी निटुरकर यांच्या हस्ते दि. 1 मार्च 2022 रोजी पहिल्या पोत्याचे पुजन करून व नारळ फोडून करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात रानबन ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन दासराव पाटील यांच्यासह नाफेड च्या अधिकाऱ्यांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता. रानबन कंपनीकडे हरभरा विक्रीसाठी अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन केले असून ऑनलाईन केलेल्या अनुक्रमे शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी केला जाणार आहे. निटूर परिसर व निलंगा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम रानबन कंपनी ने केले असून या हमीभाव खरेदी केंद्राचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

यावेळी कुमार पाटील, सोनेराव जाधव, विठ्ठल मोगरगे, संदिपान कावळे, युवराज पाटील, प्रताप झरे, दिगंबर सावंत, महमद गस्ते, सिध्देश्वर सोमवंशी, विजय जाधव, खुदबुदिन शेख, विठ्ठल कावळे, हणमंत माने, दत्ता शिरमाळे, तुकाराम घारोळे, हंसराज पाटील, शाहुराज पाटील, योगेश कावळे, व्यंकट कावळे, उमाकांत देशमुख, हणमंत पाटील, विठ्ठल जाधव, रामकिशन जाधव, तुकाराम बोरोळे व पत्रकार नामदेव तेलंगे, माधवराव शिंदे, रमेश शिंदे, रविकिरण सुर्यवंशी आदीसह मसलगा, मुगाव, हणमंतवाडी, आंबेगाव, अंबुलगा मेन, गौर, ताजपुर, शेंद व निटुर येथील हरभरा उत्पादक शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.

Previous articleराज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी केली समीरच्या शस्त्रक्रियेस 14 लाखाची मदत
Next articleनवाब नव्हे, हा तर दाऊदचा गुलाम; त्याला वाचवण्यासाठी ठाकरे सरकारवर दबाव..संभाजीराव पाटील निलंगेकर