Home वर्धा शिक्षणाला धार्मिक रंग देऊ नका

शिक्षणाला धार्मिक रंग देऊ नका

263

 

कारंजा( घा )/प्रतिनिधी :-पियुष रेवतकर

कारंजा (घा ):-शिक्षण संस्थांना व शिक्षणाला धार्मिक रंग देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये ,अशी मागणी संभाजी ब्रिगेड कारंजा तालुका कमिटीच्यावतीने करण्यात आली .कर्नाटकातील घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला .कारंजा शहरातील शासकीय विश्रामगृह कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला संभाजी ब्रिगेड चे स्थानीय नेते पियुष रेवतकर ,गौरव ढोले ,नितीन पाठे ,संभाजी ब्रिगेड कारंजा शहराध्यक्ष उमा राऊत ,सचिव गीता कळस्कर ,भाग्यश्री भगत ,मंजू मांडोकार व इतर संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .शिक्षणाला धार्मिक रंग देऊ नका ,शिक्षणाचा कोणता धर्म नसतो ,कर्नाटकात घडलेल्या घटनेला संभाजी ब्रिगेड चा जाहीर विरोध आहे असे मत संभाजी ब्रिगेड चे स्थानीय नेते पियुष रेवतकर यांनी व्यक्त केले .या बैठकीला इतरही विषयावर चर्चा करण्यात आली .

Previous articleगळफास घेत संपविले जीवन
Next articleस्वतः सक्षम होऊन इतरांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करा–प्राचार्य डॉ.विनित मत्ते यांचे प्रशिक्षणात प्रतिपादन.