अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक
गडचिरोली:-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण दोन दिवसीय जिल्हास्तर प्रशिक्षण,स्थळ:-DIET GADCHIROLI येथे दिनांक:-३ व ४ मार्च-२०२२ ला जिल्हास्तर सुलभक ज्ञानेश्वर कापगते(अहेरी) व विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते(चामोर्शी) यांचे मार्गदर्शनात घेण्यात येत आहे.
प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी शाळा व्यवस्थापन समितची रचना,गुणवत्तापूर्ण शिक्षण व शाळा व्यवस्थापन समिती,बालकांचे हक्क व सुरक्षितता,निपुण भारत अभियान या विषयावर सविस्तर माहिती देण्यात आली.
प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे प्राचार्य डॉ विनित मत्ते हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अधिव्याख्याता पुनित मातकर,प्रशिक्षणाचे सुलभक ज्ञानेश्वर कापगते व चांगदेव सोरते हे होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश गिरडकर यांनी केले.
SMC ची कर्तव्य व जबाबदारी मध्ये शाळांच्या कामकाजावर संनियंत्रण,शासकिय योजनांची प्रभावी अंमलबजावणी,मुख्याध्यापक रजा व दिर्घ रजा शिफारस.पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सहाय्य करणे या मार्गदर्शन केले.
शाळा ही समाजाने निर्माण केलेले संस्कार केंद्र आहे.गावचे शाळेशी जिव्हाळ्याचे संबंध असतात.अनेक पिढ्यांना घडवणारी व सतत नवनवीन प्रयोग करणारी शाळा ही गावासाठी भूषण असते.तर शालेय विकासासाठी तत्पर असणारी शाळा व्यवस्थापन समिती ही शाळेसाठी खूप मोठा आधार असतो.शालेय गुणवत्ता वाढवणे आणि टिकवणे ही जबाबदारी शाळेतील सर्व घटकांची असते तसेच शाळा व्यवस्थापन समितीची सुद्धा आहे.