Home Breaking News घुग्घुस येथील प्रा.आ.केंद्रात मधुमेहाच्या गोळ्या तत्काळ उपलब्ध करून द्या

घुग्घुस येथील प्रा.आ.केंद्रात मधुमेहाच्या गोळ्या तत्काळ उपलब्ध करून द्या

559

 

घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई बोढे यांची मागणी

( चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील तीन महिन्यापासून मधुमेहाच्या गोळ्या उपलब्ध नाही ही समस्या लक्षात घेत घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई बोढे यांनी शिष्टमंडळासह प्रा. आ. केंद्रात जाऊन वैद्यकीय अधिकऱ्यांची भेट घेतली व या संदर्भात चर्चा केली तसेच निवेदन देऊन प्रा.आ.केंद्रात तत्काळ मधुमेहाच्या गोळ्या उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
घुग्घुस हे औद्योगिक शहर असल्याने या शहराची लोकसंख्या पन्नास हजारांच्या जवळपास आहे तसेच घुग्घुस येथील प्रा.आ. केंद्रास परिसरातील पंधरा गावे जोडलेली आहे त्यामुळे दररोज मोठया संख्येत गोर गरीब मधुमेहाचे रुग्ण प्रा. आ. केंद्रात तपासणी करिता येतात परंतु या केंद्रात मधुमेहाच्या गोळ्या उपलब्ध नसल्याने येणाऱ्या गोर गरीब रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे मधुमेहाच्या रुग्णांना दररोज मधुमेहाच्या गोळ्यांचे सेवन करावे लागते त्यामुळे घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तत्काळ मधुमेहाच्या गोळ्या उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देतांना घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई बोढे, माजी जि.प. सभापती नितु चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य पूजा दुर्गम, सुचिता लुटे, वैशाली ढवस, लक्ष्मी नलभोगा, पुष्पा रामटेके, वंदना मुळेवार, विना घोरपडे, वंदना गणफाडे, अर्चना लेंडे, नंदा चिमुरकर, अनिता परचाके, कांचन डांगे, सुनीता पाटील, सुनीता घिवे, दुर्गा जुमनाके, प्रतिमा बहादे, अंकिता बहादे, सुनंदा लिहीतकर व लता आवारी उपस्थित होत्या.

Previous articleराष्ट्रवादी आणि भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
Next articleग्रामविकासातून राष्ट्राचा विकास साध्य होईल’ – आमदार दादाराव केचे