लोणार/सतीश मुलंगे
दिनांक 4 मार्च लोणार तालुक्यातील सरस्वती या गावी कैलास आश्रुबा इंगोले वय 38 वर्षे राहणार सरस्वती हा मृतावस्थेत संजय दिनकर कराडे यांच्या शेतात आढळला.सविस्तर वृत्त असे की फिर्यादी साहेबराव इंगोले सरस्वती यांना कैलास इंगोले हे दिनकर कराडे यांच्या शेतात सकाळी सात वाजता मृतावस्थेत आढळले त्यांनी तात्काळ ही माहिती लोणार पोलीस स्टेशनला दिली ही माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे सुरज काळे,गजानन सानप,विशाल धोंडगे सोबतच उप विभागीय अधिकारी निर्मला परदेशी यांनी घटनास्थळी जाऊन तपासाला सुरुवात केली व प्रेत ताब्यात घेऊन पोस्टमार्टम साठी ग्रामीण रुग्णालय लोणार येथे पाठवले,पुढील तपास ठाणेदार प्रदीप ठाकूर यांच्या देखरेखीखाली पोलीस स्टेशन लोणार करत आहे.