सोनाळा वन्यजीव विभागाची कारवाई
वाहन सोडून चालक फरार ,चार लाख दहा हजार किमतीचा मूद्देमाल जप्त
अनिलसिंग चव्हाण
संग्रामपूर:–छूप्या मार्गाने अवैधरित्या सालई गोंदाची तस्करी करणाऱ्यावर नाकाबंदी करून वन्यजीव विभागाने कारवाई केली आहे. हि कारवाई रात्री उशिरा ३:३० वाजे दरम्यान करण्यात आली असून वाहन चालक आरोपी फरार झाला आहे. सोनाळा परिक्षेत्र अधिकाऱ्यांना संग्रामपूर तालुक्यातील करमोडा येथे चारचाकी वाहनाने सालई गोंदाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यापुष्ठभूमीवर वन्यजीव विभागाने मध्यरात्री नंतर नाकाबंदी करून रात्री ३:३० वाजे दरम्यान भरधाव वेगाने येत असलेल्या एम एच २७ एक्स ६७८६ क्रमांकाच्या चार चाकी वाहनाला हात देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालक वाहन न थांबवता सूसाट वेगाने धामणगाव रस्त्याने निघाला. तात्काळ वन्यजीव विभागाचे अधिकारी व कर्मचाय्रांनी भरधाव वेगाने जात असलेल्या वाहनाचा पाठलाग केला. दरम्यान धामणगाव फाट्यावर वाहन सोडून चालक पसार झाला. वन्यजीव विभागाने वाहनावर ताबा मिळवत मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये सालई गोंदाने भरलेल्या २९ गोण्या आढळून आले. या गोंदाचे एकुण वजन ८ क्विंटल ७० किलो असून १ लाख ६० हजार रुपये किंमतीचे आहे. तसेच चार चाकी वाहनाची किंमत २ लाख ५० हजार असे ऐकून ४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोनाळा परिक्षेत्र कार्यालयात अज्ञात आरोपीविरुद्ध वन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर कारवाई वन्यजीवचे सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे यांच्या नेतृत्वात वनपाल जि. टी. सोळंके, वनरक्षक एम. डी. गवळी, एस. आर. गलोले, के. एच. मोरे, वनमजूर अलीम केदार, नजीर पालकर यांनी केली आहे.