(ivrcl)आय व्ही. आर.सी.एल कंपनीला काँग्रेसची तंबी
(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला
घुग्घुस : चंद्रपूर ते वणी मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूला धुळाचे ढीग निर्माण झाले असून यावरून जडवाहन जाताच धुळामूळे रस्त्यावर सर्वत्र धुळच – धूळ उडते याप्रदूषणाने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
रस्त्या वरील धूळ नियमितपणे स्वच्छ करण्यात यावी याकरिता काँग्रेसच्या शिष्टमंडळाने धानोरा टोल येथे जाऊन रस्ता स्वच्छता,रस्ता द्विभाजक स्वछता बाबतव अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
नियमितपणे स्वच्छता न केल्यास टोल विरोधात आंदोलनाचा इशारा दिला याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर,रोशन दंतलवार, विशाल मादर,इर्शाद कुरेशी,सुकुमार गुंडेटी,बालकिशन कूळसंगे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.