Home चंद्रपूर स्त्री ही कुटुंबाचा पाया ! स्त्री शिवाय कुटुंब नाही : प्रकाश देवतळे

स्त्री ही कुटुंबाचा पाया ! स्त्री शिवाय कुटुंब नाही : प्रकाश देवतळे

346

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : स्त्री ही कुटूंबाचा पाया आहे स्त्री शिवाय कुटुंब नाही व कुटुंबा शिवाय समाज नाही असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केले आहे.
घुग्घुस शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने 08 मार्च रोजी शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या तर्फे महिला दिनाचे कार्यक्रम काँग्रेस कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांनी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश टाकला 08 मार्च 1908 रोजी अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील वस्त्रोद्योगातील काम करणाऱ्या महिलांनी सामूहिकपणे मोठी ऐतिहासिक निर्दशने केली.
सदर निदर्शने कामाचे तास कमी करणे, महिला सुरक्षितता इत्यादी मागण्यांना घेऊन करण्यात आले.
याची फलश्रुती 1910 मध्ये विविध देशातील महिला प्रतिनिधीनी 8 मार्च हा महिला दिवस साजरा करण्याचा ठराव पास केला.
आज भारतात सरपंचा पासून ते राष्ट्रपती,पंतप्रधान,वैद्यकीय अधिकारी,पोलीस अधिकारी, सायकली पासून ते विमाना पर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिलांनी प्रगती केली आहे.
मात्र अजूनही महिलांन मध्ये अंधश्रद्धा,अशिक्षितपणा हे दूर करणे गरजेचे असून हुंडाबळी,
महिला अत्याचारा पासून लढा देण्यासाठी महिलांनी एकत्रित रित्या संघर्ष करणे गरजेचे आहे.
असे आवाहन रेड्डी यांनी केले.
काँग्रेस तालुकाध्यक्ष श्यामकांत थेरे यांनी स्त्री ही दोन कुटुंब सासर व माहेर जोडणारा सेतू असल्याचे भावना व्यक्त केल्या.
किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांनी महिलांनी राजकारणात पुढे येऊन देशाला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या मोदी शासनाला धडा शिकविण्याचा आवाहन केले.
याप्रसंगी मंचावर सौ.संगीता बोबडे, सौ.पुष्पा नक्षिणे, सौ.पदमा त्रिवेणी, दुर्गा पाटील,अमिना बेगम,संध्या मंडल, सौ.पुष्पा कणकम,सौ.दीपा बोकडे,
उत्तर भारतीय सेल सचिव ब्रिजेश सिंग,अल्पसंख्याक सचिव किरण झुंजीपल्लीवार,पर्यावरण तालुकाध्यक्ष महेश किण्णाके,शामरावजी बोबडे, अनिरुद्ध आवळे,अलीम शेख,मोसीम शेख,किशोर बोबडे,भैय्या भाई,स्टीवन गुंडेटी,श्रीहरी शेंगारप,गणेश उईके, रिषभ दुपारे,लखन हिकरे, हे होते
कार्यक्रमाचे संचालन साहिल सैय्यद यांनी केले
आभार प्रदर्शन कामगार नेते सैय्यद अनवर यांनी केले तर
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोशन दंतलवार, विशाल मादर, इर्शाद कुरेशी, सुकमार गुंडेटी,रोहित डाकूर,अनुप भंडारी,देव भंडारी,कुमार रुद्रारप,रमेश रुद्रारप, सुनील पाटील, रफिक शेख,बालकिशन कुळसंगे,संजय कोवे,अंकुश सपाटे,अविनाश गोगुर्ले, यांनी केले
याप्रसंगी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Previous articleराजकीय गुन्हेगारीला अटकाव घालणे आवश्यक अमरावतीत अतिरिक्त ठाणे व सीसीटीव्ही ची मागणी
Next articleयावलच्या शिक्षण विभागाला दहावी व बारावीच्या परिक्षा केन्द्रावर कुठलेही प्रकारचे भेटीचे आदेश नसतांना भेटी कशासाठी ? पं .स .मासिक सभेत चर्चा