Home Breaking News यावल तालुका ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड

यावल तालुका ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड

991

 

यावल ( प्रतिनिधी)विकी वानखेडे

यावल ता.येथील पंचायत समिती च्या सभागृहामध्ये ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली तत्कालीन यावल तालुका अध्यक्ष खुशाल पाटील यांची ग्राम रोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य संघटक प्रसिद्ध प्रमुख पदी निवड झाल्याने तसेच यावल तालुका ग्रामरोजगार सेवक संघटनेचे तत्कालीन उपाध्यक्ष श्री बाळू तायडे मारुळ यांची ग्राम रोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी  निवड झाल्याने रिक्त झालेल्या पदाकरिता आज ग्राम रोजगार सेवक संघटनेची बैठक महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवक संघटना  महाराष्ट्र राज्य संघटक प्रसिद्धीप्रमुख खुशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री बाळू तायडे मारुळ हे उपस्थितीत होते सदरचा कार्यक्रम हा यावल पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आला . यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी आपल्या मनोगतामध्ये संघटनेचे रजिस्ट्रेशन , व सभासद नोंदणी प्रक्रिये बाबतीत राज्य अध्यक्ष विलास जोगदंडे महासचिव राजेंद्र जिचकार कोषाध्यक्ष वासुदेव गोतमारे कार्यध्यक्ष देवदत्त साळवे त्यांच्या मार्गदर्शना नुसार संघटनेचे महत्व संघटनेची कार्यप्रणाली विषद करुन संघटन ही काळाची गरज असुन संघटना ही अन्यायाला वाच्या फोडणारे प्रभावी माध्यम असल्याचे आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले यावेळी नुतन तालुका कार्यकारिणी निवड करण्यात आली तिला पुढील प्रमाणे तालुका अध्यक्ष म्हणून चुंचाळे येथील ग्राम रोजगार सेवक दीपक कोळी ,उपाध्यक्ष विरोदा येथील वसीम पिंजारी ,मोहराळा येथील अनिल अडकमोल तालुका सचिव पदी वडोदा प्रया येथील सरफराज तडवी सहसचिवपदी वनोली येथील सुनील सोनवणे कोषाध्यक्षपदी शिरागड येथील कैलास साळुंके सहकोषाध्यक्ष मालोद येथील मेहरबान तडवी कार्याध्यक्ष सातोद येथील अनिल ढाके सहकार्य अध्यक्ष कठोरा येथील दिगंबर खडसे प्रसिद्धीप्रमुख कासवा येथील ईश्वर सपकाळे सह प्रसिद्धीप्रमुख वडोदा प्र सावदा येथील मुकेश सोनवणे तसेच सल्लागारपदी लूकमान तडवी, फकिरा तडवी, विजय सपकाळे,लक्ष्मण कोळी,विलास पाटील, शरीफ तडवी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाळू तायडे मारुळ महाराष्ट्र राज्य संघटक व प्रसिध्द प्रमुख खुशाल दादा पाटील व नुतनकार्यकारणीच्या पदाधिकारीची मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच संघटनेच्या कामात मारुळचे कर्तव्यदक्ष तरुण तडफदार सरपंच तथा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे यावल ता. उपाध्यक्ष सैय्यद असद अहमद यांचा ही सत्कार करण्यात आला यावेळी सुखदेव साळुंखे, संजय कोळी, ईश्वर अडकमोल, दिगंबर पाटील, राजेंद्र पाटील, निलेश तायडे आदी तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते

Previous articleभाजपा महिला आघाडी व प्रयास सखी मंच घुग्घुसतर्फे “सन्मान स्त्रिशक्तीचा” कार्यक्रम संपन्न
Next articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची पालघर जिल्हा कार्यकारिणी जाहीर