Home चंद्रपूर आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादन

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादन

363

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

शनिवार 12 मार्च रोजी घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात स्वतंत्र सेनानी, 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी वीर, चंद्रपूरचे सुपुत्र क्रांतिवीर नायक बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले तसेच त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.
यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, आदिवासी समाजाचे नंदेश्वर पेंदोर, नकोड उपसरपंच मंगेश राजगडकर, ग्रामपंचायत सदस्य रजत तुराणकर, गणेश किन्नाके, अनिकेत गेडाम, प्रकाश नैताम, श्रीराम जेऊरकर, संगीता नन्नावरे, सुशील डांगे, लता आवारी, शीतल कामतवार, भारती परते, कुमकुम वर्मा, दुर्गा साहू, स्नेहा कुम्मरवार, खुशबू मेश्राम उपस्थित होते.

Previous articleप्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार देशमुख यांच्या निववास्थानी सांत्वनपर भेट !
Next articleगोतस्करयांच्या दादागिरीला वचक बसविण्यासाठी बजरंग दल ची तक्रार