शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे
अप्पर पोलीस अधीक्षक श्रावण दत यांना गोपनीय माहिती मिळाली की होळीचा सण असल्याने शहरांमधून खेड्यापाड्यांमध्ये अवैधरित्या मोठ्या प्रमाणात दारू जाणार आहे अशा खात्रीलायक खबरे वरून पथकाला आदेशित करून रेड करण्यास सांगितले त्याप्रमाणे पथकाने पहूर्जिरा मोरखेड रस्त्यावर सापळा रचून ऑटो क्रमांक एम एच 28 T 1074 मध्ये आरोपी नामे परमेश्वर श्रीकृष्ण लाहोळकर यास देशी दारूचे 16 बॉक्स किमती 48 हजार रुपये ऑटो किंमत एक लाख रुपये आरोपीच्या ताब्यातील मोबाईल किंमत एक हजार रुपये असा एकूण 149000 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोस्ट जलब येते गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर देशी दारू बाबत अधिक तपास करून आरोपी वाढण्याची शक्यता आहे सदर कारवाई मध्ये पोहे का गजानन बोरसे नापोका गजानन आहेर संदीप टाकसाळ यांनी भाग घेतला