Home Breaking News अवैध रेती तस्करांनी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात बुडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू.

अवैध रेती तस्करांनी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात बुडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू.

391

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

नातेयवाईकांचा पोलीस स्थानकात हंगामा , पोलीस प्रशासन हाय हाय चे नारे.
गुन्हा दाखल करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही , नातीवाईकांची भूमिका
दोन दिवसांपूर्वी शेगाव तालुक्यातील ज्या परिसरात तहसीलदारांची गाडी फोडून मारहाण झाली होती त्याच परिसरात आज पूर्णा नदी पात्रातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यानी रातोरात जेसीबीच्या साहाय्याने खोदून ठेवलेल्या खड्डयात बुडून एका बारा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी घडली आहे….यामुळे संतप्त गावकऱ्यानी मुलाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात आणून शेगाव पोलीस स्थानकात चांगलाच हंगामा केलाय….जो पर्यंत गुन्हा दाखल न नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेत पोलीस स्थानकात ठिय्या दिलाय.बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध वाळू तस्करांची मुजोरी इतकी वाढली आहे की काल सायंकाळी वाळू तस्करांनी तहसीलदांची गाडी फोडत चालकाला बेदम मारहाण केली होती…..आज त्याच परिसरात पूर्णा नदी पात्रातीलरात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करणाऱ्या तस्करांनी रातोरात नदीपात्रात मोठा खड्डा खोदून त्यातील वाळू चोरून नेल्याने आज दुपारी नेहमी प्रमाणे नदीत पोहायला जाणाऱ्या भोंनगाव येथील लहान मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या खड्ड्यात बुडून अर्जुन भारसाकळे या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला…..याची तक्रार पोलीसात देण्यासाठी मुलाचे नातेवाईक गेले असता पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने नागरिकांनी व नातेवाईकांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन समोरच पोलीस प्रशासन हाय हाय…चे नारे देत मोठा गोंधळ घातला….जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे…. तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनला आलेल्या मृतकाच्या नातेवाईकांना उद्धटपना ची वागणूक देत ठाणेदाराच्या उद्दामपणा मुळे रात्री हे प्रकरण चिघळले होते.

Previous articleहत्ता येथील 10 लक्ष रुपयांचे सिमेंट रस्त्याचे काम नामंजूर करण्यासाठी निवेदन
Next articleपातृर्डा बु पाणीप्रश्न पेटणार;संगितराव भोंगळ यांनी दिला गर्भित इशारा!