Home Breaking News पातृर्डा बु पाणीप्रश्न पेटणार;संगितराव भोंगळ यांनी दिला गर्भित इशारा!

पातृर्डा बु पाणीप्रश्न पेटणार;संगितराव भोंगळ यांनी दिला गर्भित इशारा!

149

 

पाण्याच्या ऐतिहासिक लढ्यात सहभागी व्हा संगितरावांची गावकर्यांना हाक!

भरसभेत पाणिदार नेतृत्वाला अश्रृ अनावर गावकर्यांचे पाण्यासाठी लढा!
– संगितरांवांच्या आव्हानानंतर गावकरी एकवटले!

पातृर्डा बु ता संग्रामपुर ग्रामस्थांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला पाणिप्रश्न मागिल ५-६ वर्षांच्या संघर्षानंतर अखेर निकाली लागला व तब्बल २ कोटी ३१ लाख ८१ हजारांचा निधी मंजुर झाला.
मात्र, पाण्यासाठी चा लढा यशस्वी होवुन संबधित विभागाचे अधिकारी निविदा काढण्यात दिरंगाई करत असतांना त्यासाठी रात्र-दिवस विनविण्या करुन अखेर निविदा काढण्यासाठी प्रयत्न केलेत त्यानंतर ही एका पत्राचे कारण देत अधिकार्यांनी निविदा अडकवुन ठेवल्याचे सांगत भरसभेत माजी.जि.प.उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांनी अश्रुंना मोकळ करत टाहो फोडला…!
या वेळी सभेला उपस्थित असलेल्यांचे देखील डोळे पाणावले होते…
आज दि.१५ मार्च रोजी संध्याकाळी ८ वाजता स्थानिक आठवडी बाजार येथे उपरोक्त विषयाला अनुसरुन सभेचे आयोजन केले होते.
पाणीपुरवठा योजना मंजुर असतांना देखील अधिकार्यांनी निविदा थांबवुन पातृर्डा वासियांवर अन्याय केल्याने व हा पाण्यासाठी संघर्ष आपल्याला अधिक ज्वलंत करण्यासाठी गावकर्यांना संबोधित करुन नेमकं पाणीपुरवठा योजनेचे पाणी कुठ मुरलं हे गावकर्यांना समजावं यासाठी ही सभा आयोजित केल्याचे राजु पाटिल यांनी स्पष्ट केले.
मागिल ५-६ वर्षापासुन पाणीसंघर्ष सुरु असतांना अखेर कोट्यावधीचा निधी मंजुर झाला. हा लढा माझा एकट्याचा नाही .यात सर्व गावकरी सहभागी होते. मात्र, योजना मंजुर होवुनही अधिकारी अडेटट्टुपणे निविदा थांबविण्याचे काम करत आहेत व अशा अधिकार्यांना धडा शिकविण्यासाठी लोकशाही मार्गाने पाण्याचा लढा उभारत आहोत व या लढ्यात मला गावकर्यांची सोबत हवी असे सांगताना, आज पासुन हा पाणीप्रश्न बुलढाणा ते मुंबई पर्यंत ज्वलंत करु असा इशारा यावेळी संगितराव भोंगळ यांनी दिला.
महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्हाचे पालकमंत्री ना.राजेंद्र शिंगणे यांनी सातत्याने सहकार्य करुन स्पष्ट शब्दात या योजनेच्या मंजुरातीसाठी पत्र दिलेले आहे. व ती योजना मंजुर सुध्दा झाली परंतु संबधित विभागाचे अधिकारी योजनेबाबत स्वातंत्र्य पध्दतीने भुमिका न घेता या योजनेचे काम सार्वजनिक स्वरुपातुन व्हावे अशी मानसिकता ठेवुन निविदा मंजुर करण्यात आडकाठी धोरण अवलंबवित आहेत. ही निविदा मंजुर व्हावी याकरिता मागिल पंधरा दिवसापासुन संबधित विभागाला जाब विचारत आहे. मात्र, मला अनभिज्ञ ठेवुन पातृर्डा गावासाठी मँजुर झालेल्या पाणीपुरवठा योजने वर पाणी फिरविण्याचा अधिकार्यांचा मनसुबा यशस्वी होवु द्यायचा नाही आणी म्हणुन आज पासुन या पाण्यासाठीच्या लढ्यात गावकर्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन मा.जि.प.उपाध्यक्ष संगितराव उपाख्य राजु पाटिल भोंगळ यांनी केले.
या सभेला बहुसंख्य गावकरी उपस्थित होते.
यावेळी संगितराव भोंगळ यांचे भाषण संपल्यावर गावकर्यांनी या आंदोलनात आम्ही सर्व सोबत असल्याचे सांगत संगितराव आप आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या.
(संगीतराव भोंगळ यांनी पार्तृडा बु गावासाठी मंजुर केलेली पाणीपुरवठा योजना स्वातंत्र मंजुर झालेली आहे.त्यामुळे या योजनेचे काम देखील स्वतंत्रच व्हायला हवे असा सूर सर्वत्र गावकऱ्यांचा होता हे)
मात्र, संबधित अधिकारी निविदा काढण्यास विलंब लावत असतील कींवा रद्द करण्याचा प्रयत्न करित असतील तर पातृर्डा ग्रामस्थ तिव्र स्वरुपाचे आंदोलन उभारुन प्रशासनाल जरिस आणल्या शिवाय राहणार नाही असा सुर सभेतुन व्यक्त झाला

Previous articleअवैध रेती तस्करांनी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात बुडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू.
Next articleतु माझ्या सोबत मैत्री कर तु मला आवडली आहे. एका विरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल