Home Breaking News तु माझ्या सोबत मैत्री कर तु मला आवडली आहे. एका विरूध्द विनयभंगाचा...

तु माझ्या सोबत मैत्री कर तु मला आवडली आहे. एका विरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल

610

 

यावल तालुका ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

सांगवी बुद्रुक ता. यावल येथील पिडीत 20 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादी नुसार ती व तिची नणंद मंगळवारी सकाळी 11 वाजेला गावातील हौदावर धुणे धुत असतांना जहांगीर तडवी रा. बोरखेडा ता. यावल हा तिच्याजवळ आला व तिला दम देवुन तिचा मोबाईल नंबर घेवुन हौदापासुन ते घरापावेतो पाठलाग केला व तु माझ्या सोबत मैत्री कर तु मला आवडली आहे. मी तुला खुश ठेवीन असे बोलुन मोबाईलवर फोन करुन तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे तेव्हा हा प्रकार पिडीतने आपल्या पतीसह कुटुंबास सांगीतला व रात्री उशीरा यावल पोलिसात जहांगीर तडवी यांच्या विरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास हवालदार अशोक जवरे करीत आहे.

Previous articleपातृर्डा बु पाणीप्रश्न पेटणार;संगितराव भोंगळ यांनी दिला गर्भित इशारा!
Next articleशाळा पूर्वतयारी अभियान प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत–प्राचार्य डॉ विनित मत्ते यांचे आवाहन.