लातूर/निलंगा प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांच्या हस्ते आज गुरुवार दि. १७ मार्च २०२२ रोजी दुपारी लातूर शहरानजीकच्या भांबरी चौक येथे राज्यमार्ग २३६ ते भांबरी (बसवंतपूर) रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद पटेल, ट्वेंटीवन शुगर कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, जिल्हा परिषद सदस्य परमेश्वर वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य पंडित ढमाले, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, विलास सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनंत बारबोले, प्रताप पाटील, सोशल मीडिया काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे उपअभियंता जयंत जाधव, शाखा अभियंता प्रभाकर भवाळ, महेश काळे आदी उपस्थित होते,
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव म्हणाले की राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी त्यांच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचा फायदा लातूर जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सह विविध रुग्णालयांना करून देऊन कोरूना काळात उत्कृष्ट आरोग्याच्या सोयीसुविधा मिळवून दिल्या पालकमंत्र्यांनी लातूरच्या विकासाचा आराखडा तयार केला असून लातूर चा विकासाचा पॅटर्न ते निर्माण करत आहेत विकासाची सर्व कामे पालकमंत्री देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करून पूर्णत्वाला घेऊन जाऊ अशी ग्वाही त्यांनी दिली.
लातूर शहरानजीकच्या भांबरी चौक येथे राज्यमार्ग २३६ ते भांबरी (बसवंतपूर) रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ प्रसंगी भांबरी(बसवंतपूर) च्या सरपंच पंचशीला वाघमारे, उपसरपंच दिलीप चिकटे, ग्रामसेवक शंकर भोसले, दिगंबर माने, प्रबत पाटील, दिगंबर माने, बिरू सरवदे, मारुती चीगुरे, बसवेश्वर लांडगे आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते भांबरी (बसवंतपूर) ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक शंकर भोसले यांनी करून शेवटी उपस्थित मान्यवरांचे त्यांनी आभार मानले.