Home Breaking News आंदोलनात सक्रीय सहभागी असलेल्या बडतर्फ एस. टी. कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

आंदोलनात सक्रीय सहभागी असलेल्या बडतर्फ एस. टी. कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

262

 

लातूर/निलंगा प्रतिनिधी
डी.एस. पिंगळे

मागील चार महिण्यापासून एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाकडे यांच्या विविध मागण्या व विलणीकरण यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. अजूनही काही कर्मचारी कामावर रूजू न होता त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामध्येच निलंगा आगारातील कामावर रूजू न झालेल्या सतीश मधूकरराव चपटे वय ४० या निलंगा आगारातील यांत्रिकी कर्मचा-यालाही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ लातूर विभाग यांच्याकडून एकतर्फी चौकशीअंती ८ जानेवारी रोजी बडतर्फ (डिसमिस) केले होते त्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने शनिवारी ता. 19 रोजी मृत्यू झाला असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.
हा कर्मचारी विविध मागण्यासाठीच्या काम बंद आंदोलनात सक्रीय सहभागी होता. त्यामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांना मागील चार महिण्यापासून कोणताही पगार नव्हता म्हणून निर्माण झालेल्या आर्थिक विवंचना व ताणतणावामुळे त्यांचा शनिवारी दिनांक १९ रोजी हृदयविकाराच्या
झटक्याने मृत्यू झाला असून त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी दोन मुले असा परिवार आहे.
निलंगा आगारातील अशा एकून ६८ कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई करण्यात आली असल्याने बहूतांश कर्मचारी हे सध्या तणावग्रस्त जीवन जगत असून त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे.असे किती बळी जाण्याची वाट हे राज्य शासन बघणार आहे असा संतप्त सवाल नातेवाईकाकडून उपस्थित केला जात आहे.

Previous articleधुलीवंदनाच्या दिवशी लेआऊट व्यवसाय धारकांचा जमीन प्रॉपर्टी च्या वादातून जीवघेणा हल्ला
Next articleखामगाव पथकाची सोनाळा व टूनकी वरली मटका जुगारावर धाड,6 जणाविरुद्ध कारवाई ,14 हजराचा मुद्देमाल जप्त …!