Home Breaking News सांगवी बुद्रुक येथील विवाहिता तीन दिवसांपासून बेपत्ता; यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद

सांगवी बुद्रुक येथील विवाहिता तीन दिवसांपासून बेपत्ता; यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद

1287

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील २८ वर्षीय विवाहिता ही तीन दिवसांपासून आपल्या माहेरी जात असल्याचे सांगून बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी सोमवारी २१ मार्च रोजी सकाळी यावल पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली सविस्तर माहिती अशी की, यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील रहिवाशी प्रिती योगेश नेमाडे (वय-२८) या विवाहिता पती व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. शनिवारी १९ मार्च रोजी सकाळी ८ वाजता अंजाळे ता. यावल येथे माहेरी जाते असे सांगून घरातून गेल्या. सायंकाळ पर्यंत त्या माहरी घरी न पोहचल्याने पती योगेश नेमाडे यांनी आपल्या गाव परिसरात शोधाशोध केली. मात्र, ती महिला कुठेच मिळून आल्या नाहीत. दरम्यान, पती योगेश नेमाडे यांनी सोमवारी २१ मार्च रोजी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात आपली पत्नी प्रिती नेमाडे या हरविल्याची नोंद करण्यात आली . या घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी हे करीत आहे.

Previous articleडांभुर्णीच्या जिल्हा परिषद शाळेची शासनाच्या १६ कलमी कार्यक्रमा अंतर्गत उत्कृष्ठ कामगीरी म्हणुन यावल तालुक्यात प्रथम
Next articleआजाराने हिरावले ऐन तारुण्यात महिलेचे दोन्ही पाय