चामोर्शी,मुलचेरा आणि एटापल्ली तालुक्यातील शिक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद.
अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक
चामोर्शी:- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा,स्टार्स प्रकल्प,अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने दिनांक २१ व २२ मार्च २०२२ ला गट साधन केंद्र चामोर्शी येथे चामोर्शी,मुलचेरा,एटापल्ली तालुक्यातील ५८ शिक्षण व अंगणवाडी सेविकांचा शाळा पूर्व तयारी अभियान तालुका स्तरीय प्रशिक्षण मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दरम्यान तालुका सुलभक म्हणून विनायक लिंगायत,अमर पालारपवार,किशोर खोब्रागडे,कन्हैया भांडारकर,चांगदेव सोरते,कु सरलक्ष्मी यामसनी यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दिनांक २१ मार्चला उद्घाटनप्रसंगी नरेंद्र कोत्तावार,शिला सोमनकर,प्रथम संस्थेचे जिल्हा समन्वयक श्रीकांत पावडे, विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते,अमर पालारपवार, किशोर खोब्रागडे,कन्हैया भांडारकर,विनायक लिंगायत, घनश्याम वांढरे उपस्थित होते.
दोन दिवस चाललेल्या प्रशिक्षणात शाळापूर्व तयारी अभियानाची उद्दिष्टे,मागील दोन वर्षात झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढणे,
इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे.मुलांना शिकवण्यासाठी प्रेरीत करण्याकरिता स्वतः साक्षर असले पाहिजे हे गरजेचे नाही हे पालकांना समजावणे यावर भर देण्यात आला.
प्रशिक्षणात चर्चिले गेलेले घटक हे प्रशिक्षण कार्यशाळेची औपचारिक सुरुवात, परिचय-प्रार्थना-अपेक्षा-नियम.
आता शाळा पुन्हा सुरू झालेल्या आहेत,मुलांच्या शिक्षणाविषयी आता तुम्हाला काय जाणवते आणि काय दिसते आहे?(माईंड मॅप द्वारा सामुहिक मत).शाळा पूर्व तयारी अभियान संकल्पना,मोठ्या गटात चर्चा.
शाळा पूर्व तयारी मेळावा:-स्वरूप आणि पूर्वतयारी,मेळाव्याची पूर्वतयारी चर्चा.
Feedback व उद्याच्या Session संदर्भात सूचना,
वैशिष्ट्येपुर्ण बाबी म्हणजे प्रशिक्षणार्थी यांचा कृतीशील सहभाग,गटामध्ये चर्चा व सादरीकरण,सांघिक भावना.
‘शाळापूर्व तयारी अभियान’ : का?COVID19 मुळे मार्च 2020 पासून शाळा अचानक बंद झाल्या… आता हळू-हळू शाळा पुन्हा सुरु झालेल्या आहेत.या पार्श्वभूमीवर आपण शाळा पुन्हा नव्याने सुरु करताना विशेष काहीतरी केले पाहिजे,म्हणून प्रथम संस्था, MSCERT,समग्र शिक्षा आणि शिक्षण विभाग यांनी एकत्र येऊन मार्च ते जून २०२२ या दरम्यान शाळापूर्व तयारी अभियान चालविण्याचे योजिले आहे.प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी विविध प्रकारच्या सात स्टाल वर प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
मुलांच्या शालेय शिक्षणाची सुरूवात चांगली झाली तर पुढील शिक्षण प्राप्त करणे त्यांना सहज शक्य होऊ शकेल.
अनेक अहवालातून आणि अनुभवातून असे आढळले आहे कि मुलं शाळापूर्व तयारी अभावी इयत्ता पहिलीत येतात आणि त्यांना औपचारिक शिक्षण प्राप्त करताना अनेक अडचणी येतात.परिणामतः पुढे वाचन-गणिताच्या पायभूत क्षमता देखील पूर्णपणे विकसित होत नाहीत.अशी मुलं पुढे जाऊन अभ्यासात मागेच पडतात.शिवाय यावर्षी इयत्ता १-२ री मधील मुलांनी नीट अंगणवाडी आणि शाळा सुद्धा अनुभवलेली नाही.
शाळा पुन्हा सुरु होत असताना गावस्तरावर पालक,शिक्षक, अंगणवाडी,तरुण स्वयंसेवक, ग्रामस्थ व शासन यांच्या संयुक्त प्रयत्नांनी इयत्ता पहिलीत आलेल्या मुलांच्या ‘शाळापूर्व तयारी साठी राज्यव्यापी मोहिम घेण्याचे आखले आहे.सर्वांनी सदर मोहिमेत कृतीशील सहभागी होऊन दाखल पात्र मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी जनजागृतीसह प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा हिच अपेक्षा वर्तविण्यात आली आहे.