Home Breaking News यावल येथे आमदार सौ .लताताई सोनवणेंच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत...

यावल येथे आमदार सौ .लताताई सोनवणेंच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत धनादेश वाटप

510

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील चोपडा मतदार संघातील विविध गावातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील कुटुंबातील कमाविता व्यक्ति मरण पावलेल्या कुटुंबाला शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत चोपडा आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या हस्ते २६लाभार्थ्यांना पाच लाख विस हजार रूपयांचे धनादेश वितरीत करण्यात आलीत. यावल तहसील कार्यालयात चोपडा मतदार संघातील लाभार्थ्यांना आज संपन्न झालेल्या या कार्यक्रमात अनेक दिवसापासून मदतीच्या प्रतिक्षेत असलेल्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना चोपडा मतदार संघाच्या आमदार सौ .लताताई सोनवणे यांच्या हस्ते व तहसीलदार महेश पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रविन्द्र सोनवणे , यावल शहर शिवसेना प्रमुख जगदीश कवडीवाले , मोहराळा येथील सरपंच सौ .नंदा गोपाळ महाजन , सेनेचे पप्पु जोशी , नायब तहसीलदार आर डी पाटील यांच्यासह अनेक शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते . या२६ लाभार्थांना मिळाला राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा लाभ ,१ )योगीता सुतार , रा .आडगाव ता . यावल , २ )सरलाबाई पाटील , रा . चिंचोली , ३ ) समिना तडवी , रा कासारखेडा , ४ ) दिपाली बडगुजर , रा . साकळी , ५ ) शोभा तायडे , रा .कोरपावली, ६ ) साहेराबी सैय्यद , रा . साकळी , ७ ) कैलास पाटील , रा . चुंचाळे, ८ ) वंदनाबाई भालेराव , रा .थोरगव्हाण, ९ ) सुभाबाई सोनवणे , रा .मनवेल, १० ) फातमाबाई तडवी , रा .कोरपावली , ११ ) सुगराबाई तडवी , रा . चुंचाळे , १२ ) सुरेखाबाई सोनवणे , रा .वढोदे प्र . यावल , १३ ) शोभा सोनवणे रा .वढोदे प्र . यावल , १४ ) मुक्ताबाई चौधरी , रा .वढोदे प्र . यावल , १५ ) रत्ना सोनवणे , रा .वढोदे प्र . यावल , १६ /हिरकणबाई पाटील , रा . नायगाव , १७ )सरला पवार, रा . नायगाव , १८)रिना मेढे, रा .नावरे , १९ ) सोनाबाई भालेराव , रा .मनवेल, २० ) मंगला जाधव , रा .किनगाव बु , २१ )सोनी साळुंके , रा .किनगाव बु , २२ )शांताबाई सपकाळे , रा . साकळी , २३ ) हनिफा तडवी , रा . सावखेडा सिम , २४ )रंजना कोळी , रा. डांभुर्णी, २५ ) उज्वला साळुंके , रा . चिंचोली आणी संगीता सोळुंके यांचा समावेश आहे .

Previous articleहिंगणघाट शास्त्री वार्ड येथे स्वयंपाक करताना सिलेंडरचा स्फोट
Next articleकोल्हापूरी बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा चोरणारी टोळी हिंगणघाट डीबी पथकाची कारवाई