(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला
घुग्घुस परिसरात पाण्याची टाकी बनवा अशी मागणी एआयएमआयएम पार्टीतर्फे आमदार किशोर जोरगेवार यांना निवेदन देऊन केली आहे.
घुग्घुस येथील शिवनगर, शास्त्रीनगर, आंबेडकर नगर येथे पिण्याच्या पाण्याची टाकी नाही या वार्डातील लोकसंख्या हि 10 ते 15 हजार आहे. तसेच आठवडी बाजार व तलाव परिसरात पाण्याची टाकी नाही या वार्डातील लोकसंख्या हि 15 हजाराच्या जवळपास आहे. सध्या तीव्र उन्हाळा सुरु असल्याने या वार्डात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. येथील वार्डातील लोकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. अपुऱ्या पाण्यामुळे वार्डातील लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे घुग्घुस येथील एआयएमआयएम पार्टीतर्फे आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आमदार किशोर जोरगेवार यांनी मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शहर अध्यक्ष सानु सिद्दीकी, कौसर शेख, मानु सिद्दीकी, मोशिम शेख, सोनू किंग, हसनैन शेख, मुन्ना शेख, फैज़ान सिद्दीकी उपस्थित होते.