यावल( प्रतिनिधी )विकी वानखेडे
येथील प्रथमवर्ग न्यायालयात शनिवारी दिनांक ७ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात संपन्न झाले या लोकअदालतीला नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळाला , या राष्ट्रीय लोकअदालती मध्ये दिवाणी,फौजदारी व दाखल होण्यापूर्वी चे विविध वित्तीय संस्थाचे एकूण १ हजार ८७७ प्रकरण ठेवण्यात आले होते तर यातील २७ प्रकरणांमध्ये तडजोड करीत निपटारा करण्यात आला व २९ लाख ९२ हजाराची वसुली झाली आहे.
यावल येथील प्रथमवर्ग न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाली यात पॅनल प्रमुख म्हणून सह दिवाणी न्यायाधीश व्ही. एस. डामरे तर पंच न्यायाधीश म्हणून एड. के.डी. सोनवणे, एड. डी.आर. बाविस्कर यांनी कामकाज पाहिले या पॅनल समोर दिवाणी ७९फौजदारी १९२ व दाखल होण्यापूर्वी चे १हजार६०६ असे एकूण १हजार ८७७ प्रकरण ठेवण्यात आली होती. यामध्ये दिवाणी खटल्यात १३ प्रकरणात तडजोड करून निपटारा करण्यात आला व १८ लाख ०३ हजार ३४८ रुपयांचा वसूल करण्यात आला तसेच फौजदारी प्रकरणात सात केसेस तडजोडीने निकाली काढण्यात आल्या व यात ४ लाख २६ हजार ५९८ रुपयांचा वसूल करण्यात आला तर दाखल होण्यापूर्वीचे सात प्रकरण निकाली काढण्यात आले व ०७ लाख ६५ हजार ५४३ रुपयांचा वसूल न्यायालयासमोर करण्यात आला. तेव्हा एकूण या राष्ट्रीय लोक अदालतिच्या पॅनल समोर ठेवण्यात आलेल्या १ हजार ८७७ पैकी २७ प्रकरणात आपसात तडजोड करुन निपटारा करण्यात येऊन २९ लाख ९२हजार ४८९ रुपयाची वसुली करण्यात आला आहे या राष्ट्रीय लोक अदालत साठी न्यायालयीन अधीक्षक सुनील शुक्ल, सहाय्यक अधीक्षक सी.एम. झोपे, आर. एस. बडगुजर, आर. व्ही. आमोदकर,एस. आर. तडवी, एस.जी सूर्यवंशी, ए.बी. बागुल, डी.ए..गावंडे, एस.ए.ठाकूर, एस. एस. वाघ, जी.एस.लाड, एम.डी.जोशी, एम.एस. सपकाळे यांनी कामकाज पाहिले.– पूर्ण फोटो आहे