Home Breaking News महिंद्रा बोलेरो गाडीला अपघात गाडी पलटी

महिंद्रा बोलेरो गाडीला अपघात गाडी पलटी

325

 

पल्लवी कोकाटे:- जळगाव जामोद

जामोद कडुन सुनगाव कडे येत असताना महिंद्रा बोलेरो गाडीला क्रमांक एम पी 12 एफ 1 4 7 2 अपघात झाल्याची घटना आज दुपारी चार वाजताच्या सुमारास जामोद सुनगाव रोडवर सुनगाव नजीक घडली त्यामध्ये बोलेरो गाडीमध्ये पाच ते सहा महिला व तीन ते चार पुरुष असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले गाडी ही जामोद वरून सूनगावकडे येत असताना भरधाव वेगात चालकाचे नियंत्रण सुटल्या मुळे गाडी रोडच्या बाजूला पलटी होऊन चाके पूर्ण वर झालेली आढळून आले त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या प्रत्यक्ष दर्शनी हा अपघात पाहिल्याने सदर लोकांना गाडीतून काढण्यास मदत केली व त्यांना जळगाव सामान्य रुग्णालय येथे नेण्यात आले गाडी ही भरधाव वेगाने असल्यामुळे गाडीला दोन ते तीन पलट्या होऊन गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु कोणत्याही प्रकारचे सुदैवाने जीवित हानी झाली नाही

Previous articleमहावितरण कार्यालया पुढे चालू असलेल्या सोनाळा सरपंच व पांडवसर यांचे उपोषणाची ३ दिवशी लेखी पत्राद्वारे उपोषणाची सांगता……
Next articleजळगाव जामोद येथे विहिरीत उडी घेऊन २२वर्षीय तरुणाने केली आत्महत्या