Home Breaking News पुर्णा नदीपात्रात उडी घेतलेल्या मोठ्या-उमरीतील अक्षयचा युद्ध पातळीवर तपास सुरू

पुर्णा नदीपात्रात उडी घेतलेल्या मोठ्या-उमरीतील अक्षयचा युद्ध पातळीवर तपास सुरू

299

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

अकोला, दि.६गांधीग्राम येथे शुक्रवारी दि.५ /अक्षय गजानन ताथोड वय २५/ वर्ष रा. विश्वकर्मा नगर मोठी उमरी हा युवक गांधीग्राम येथुन पुर्णा नदी पात्रात वाहुन गेल्याची माहिती जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागास मिळाली. त्यानुसार तात्काळ आपत्कालीन पथकाने गांधीग्राम येथे पुर्णा नदीच्या पात्रात बोटीद्वारे शोध कार्य सुरू केले. या शोधकार्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या निर्देशानुसार,जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग अकोला चे विभाग प्रमुख संदीप साबळे, तलाठी सुनील कल्ले, तलाठी हरीहर निमकंडे, ग्रामसेवक सुनील अवधूत, वंदे मातरम् आपत्कालीन बचाव पथक कुरणखेड अध्यक्ष उमेश आटोटे,संत गाडगे बाबा आपत्कालीन पथक पिंजर अंकुश सदाफळे, साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा रा.से.यो. आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक आदित्य इंगोले, प्रवीण गावंडे, ज्ञानेश्वर खडसे यांचे पथक कार्यरत आहे

Previous articleपत्रकार सन्मान योजना व द्विवार्शिक वृत्तपत्र पडताळणी च्या अटी शर्ती शिथिल करण्यात याव्यात
Next articleवाहळा बु.येथे वरली मटकऱ्यावर चान्नी पोलीसांची धाड