Home Breaking News चोपडा हादरल प्रेमीयुगुलाचा खून… तरुणीच्या भावाने युवकाला घातल्या गोळ्या, बहिणीचा गळा दाबून...

चोपडा हादरल प्रेमीयुगुलाचा खून… तरुणीच्या भावाने युवकाला घातल्या गोळ्या, बहिणीचा गळा दाबून खून

1331

 

कार्यकारी संपादक विकी वानखेडे

चोपडा : राज्यसह संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना चोपड्यात घडली आहे. चोपड्यात दोघांचा खून झाला आहे. त्यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी स्वताहा
पोलीस स्थानकामध्ये हजर होऊन खून केल्याची कबुली चक्क
पोलिसांना दिली आहे. सविस्तर माहिती असे की, चोपडा शहर पोलीस स्थानकात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा पिस्टल घेऊन पोलिसात हजर झाला आणि आपण दोघांचा खून केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी चोपडालगत जुना वराड रोड शिवारात पाहणी केली असता नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून
आले. त्यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले. दरम्यान, पोलिसांनी दोन संशयित अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तर दोघांचा शोध सुरु आहे. वर्षा समाधान कोळी (वय २०, रा.सुंदरगगढी, चोपडा) आणि राकेश संजय राजपूत (वय, २२, रा. रामपूरा
चोपडा) अशी मयत युगालाची नाव आहेत. प्रेम संबंधातून खून झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी मयत मुलीचा अल्पवयीन भाऊच फिर्यादी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रेम संबंधातून खून झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी मयत मुलीचा अल्पवयीन भाऊच फिर्यादी
झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास सहा. पोलीस अधीक्षक रावले हे करीत आहेत.

Previous articleजवाहर नवोदय विद्यालय घोटच्या वतीने घोट गावात हर घर तिरंगा रॅली….!
Next articleहिंगणघाट नगर परिषदेने दिला सफाई कर्मचाऱ्यांना ध्वजारोहणाचा मान