Home Breaking News हिंगणघाट नगर परिषदेने दिला सफाई कर्मचाऱ्यांना ध्वजारोहणाचा मान

हिंगणघाट नगर परिषदेने दिला सफाई कर्मचाऱ्यांना ध्वजारोहणाचा मान

548

 

हिंगणघाट – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्याने शासनाचे आदेशानुसार दिनांक १३-०८-२०२२ ते दिनांक १५-०८-२०२२ या कालावधीत सर्व शासकिय, निमशासकिय आस्थापना यांचेवर ध्वाजारोहण करण्याच्या सुचना प्राप्त झालेल्या आहेत. त्याअनुषंगाने हिंगणघाट नगर परिषदेमध्ये दिनांक १३-०८-२०२२ व दिनांक १४-०८-२०२२ रोजी सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नगर परिषदेचे नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी श्री. हर्षल गायकवाड यांनी दिनांक १४-०८-२०२२ रोजी ध्वजारोहणाचा मान शहराचा कणा असलेले तसेच कोव्हीड-१९ च्या काळात व पुरपरिस्थितीत स्वच्छतेचे काम अहोरात्र करणाऱ्या सफाई कर्मचान्यांना दिला. त्यावेळी सफाई कामगार प्रतिनिधी म्हणून श्री. राजु मोगरे, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणाचा मान सफाई कर्मचाऱ्यांना देऊन खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला.

Previous articleचोपडा हादरल प्रेमीयुगुलाचा खून… तरुणीच्या भावाने युवकाला घातल्या गोळ्या, बहिणीचा गळा दाबून खून
Next article15 ऑगस्ट निमित्य शालेय विद्यार्थ्यांना बुक, पेन्सिल, मिठाई वाटप करण्यात आली.